मी पालकमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा, पण.. मुश्रीफ चांगलं काम करीत आहेत- ना. गडाख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 2, 2021

मी पालकमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा, पण.. मुश्रीफ चांगलं काम करीत आहेत- ना. गडाख

 मी पालकमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा, पण.. मुश्रीफ चांगलं काम करीत आहेत- ना. गडाख

महापौर रोहिणी शेंडगेंनी स्वीकारला ‘महापौर’ पदाचा पदभार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असून कुठल्याही पक्षाच्या काही तक्रारी असतील, तर त्या एकत्रित पणे येऊन त्या सोडवल्या जातात. समन्वयाने काम केले जाते. मी पालकमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांची भावना असेलही, मात्र येथील पालकमंत्री चांगल्या पद्धतीने काम करत आहे. संवादातून अनेक प्रश्न मार्गी लागतात, आगामी काळामध्ये सुद्धा संवाद ठेवून जिल्ह्यातील सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावणार असल्याचे मत राज्याचे मृद, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले. अहमदनगर महानगरपालिकेच्या नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी आज महापौर पदाचा पदभार घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.
नूतन महापौरांचा ना. गडाख यांनी सत्कार केला. श्री गडाख पुढे म्हणाले की, राज्यामध्ये मागील काळामध्ये राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियान संदर्भात ज्या तक्रारी आलेल्या आहेत, त्याची खुली चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान राज्यामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना लागू केली असून नगर जिल्ह्यातील बंधारे दुरुस्त केले जाणार आहेत. त्याचा एक महिन्यांमध्ये अहवाल देण्याचे आदेश येथील प्रशासनाला दिले आहेत.
मागील पाच वर्षाच्या सरकारच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभिनयाची कामे करण्यात आलेली होती. त्या कामाच्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कॅगने अहवाल दिल्यानंतर या योजनेमध्ये जी कामे झाली, त्यातील 70 टक्के कामांमध्ये अनियमितता असल्याचे निष्पन्न झाले होते. 2000 कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणाची खुली चौकशी करावी, अशी शिफारस समितीने सरकारकडे केली होती. कामाचा दर्जा तसेच निकष या सर्व बाबींची पडताळणी करून ती समिती आपला अहवाल देणार आहे. अकराशे ते बाराशे कामांची चौकशी होणार असल्याचे मंत्री गडाख यांनी सांगितले.
संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर त्यानंतरच पुढील कारवाई निश्चितपणे केली जाईल, असेही गडाख यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये त्यावेळेला नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च जलसंधारण विभागाचा अभियानावर झालेला होता. अनेक जिल्ह्यातून या कामांच्या तक्रारी आलेल्या होत्या. पण कामांची संख्या मोठी असल्यामुळे सर्वच कामांची चौकशी न करता समितीने अंतिम अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचेही मंत्री गडाख यांनी सांगितले.
राज्यामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सर्व बंधारे दुरुस्त केले जाणार आहेत. यामध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग यासह इतर विभाग आहेत. त्या विभागाच्या अंतर्गत येणारे बंधारे किती, मध्यम बंधारे, मोठे बंधारे यांचा यामध्ये समावेश आहे. दोन महिन्यांमध्ये हे बंधारे दुरुस्त करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यामध्ये येत्या दहा वर्षांमध्ये जे बंधारे नादुरुस्त झालेले आहेत, ते प्रामुख्याने घेतले जाणार आहे. एकूण 13 ते 14 हजार बंधारे दुरुस्ती करावी लागणार आह. कोरोना मुळे निधीचीची कमतरता आहे.
मात्र याकरता सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, दोन वर्षांमध्ये हे बंधारे दुरुस्तीचे काम पूर्णत्वाला नेले जाणार असल्याचेही मंत्री गडाख यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये अकराशे बंधारे दुरुस्त होऊ शकतात. त्या अनुषंगाने संबंधित विभागाला एक महिन्याच्या आत या संदर्भातील प्रस्ताव सादर करावा, अशा प्रकारच्या सूचना येथील जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही मंत्री गडाख यांनी सांगितले.
महापौर रोहिणी शेंडगे पुढे म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आ. संग्राम जगताप, आ. अरुण काका जगताप यांचे आशीर्वादामुळे मला महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांचा पाठबळावर मी माझ्या कारकिर्दीत नगरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेल. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी याप्रसंगी नूतन महापौरांचा सत्कार केला यावेळी ना. गडाख म्हणाले की नगर शहराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा आपण प्रयत्न करू ग्रामीण भागातील नद्या, नाले, ओढे दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून पावसाळ्यातील पाणी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच नगर महापालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी तलावा जवळील जागेत पर्यटन स्थळ बनविण्याचा मानस असून यासाठी मोठा निधी उपलब्ध केला जाईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आ. संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, भाऊ बोरुडे, शाम नळकांडे, दत्ता जाधव, संतोष गेनाप्पा, अशोक बडे, दीपक खैरे, दत्ता सपे, आनंद लहामगे, सचिन शिंदे, सुरेखा कदम, प्रशांत गायकवाड, शिवसैनिक-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून नगर शहरातील सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा संकल्प आज नगर महापालिकेच्या नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व आ. संग्राम जगताप यांचे उपस्थितीत महापौर पदाचा पदभार घेताना व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here