सेवाश्रयचा कन्यादान उपक्रम कौतुकास्पद ः वाळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 17, 2021

सेवाश्रयचा कन्यादान उपक्रम कौतुकास्पद ः वाळके

 सेवाश्रयचा कन्यादान उपक्रम कौतुकास्पद ः वाळके


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी काम करणार्या सेवाश्रय फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून  माळी बाभूळगाव येथील पितृछत्र हरपलेल्या गरजू कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या हस्ते संबधित कुटुंबाला देण्यात आला. याप्रसंगी सेवाश्रयचे शिक्षक दाम्पत्य पोपटराव फुंदे, अनुराधा फुंदे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी अनिल महाराज वाळके म्हणाले, आपण समाजाच देण लागतो ही जबाबदारी स्विकारुन गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचे व्रत घेतलेल फुंदे शिक्षक दाम्पत्य सेवाश्रय फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवत असलेला कन्यादान उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. अशा उपक्रमाचा आदर्श घेऊन इतरांनीही असेच सामाजिक कार्य केले पाहिजे, असे आवाहन केले.
कोरोनाच्या संकट पतीच झालेल निधन यामुळे रोजच जगण मुश्कील झालेल असतांना मुलीच लग्न कस करायच अशा चिंतेत असलेल्या विधवा भगिनीला आर्थिक आधार देत पाठीशी उभ राहिलेलं वायकरवस्ती जि.प.शाळेत कार्यरत असलेल फुंदे शिक्षक दाम्पत्य आपल्या वेतनातील काही हिस्सा समाजातील गरजू,निराधार,निराश्रित अनाथ यांच्या शिक्षणासाठी  तसेच उदरनिर्वाहासाठी निरपेक्ष भावनेने खर्च करत आहे अशा प्रकारच दातृत्व आणि औदार्य आजच्या काळात आदर्शवत आहे. सामाजिक बांधिलकी जपणार्या या उपक्रमाच सर्वच स्तरातून मोठ कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here