कोविड काळात रक्तदान शिबिराचे कार्य कौतुकास्पद- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

कोविड काळात रक्तदान शिबिराचे कार्य कौतुकास्पद- आ. जगताप

 कोविड काळात रक्तदान शिबिराचे कार्य कौतुकास्पद- आ. जगताप

नालेगाव येथील रणसंग्राम प्रतिष्ठानने कोरोना संकट काळात रक्तदान शिबिरातून जपली परंपरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे नागरिक एकमेकांनपासून दूर गेले आहेत. कोरोनाचा संसर्ग हा एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणात होऊ न शकल्यामुळे राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवत होता, इतर आजारांसाठी उपचार किंवा शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासत असते यासाठी सर्वत्र रक्तदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे.नालेगाव येथील रणसंग्राम प्रतिष्ठानने गेल्या पंधरा वर्षाची परंपरा राखत कोरोना संकट काळातही भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत पै.वैभव वाघ यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
नालेगाव येथील रणसंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, प्रा.माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, प्रा.अरविंद शिंदे, संतोष लांडे, राम वाघ, विकी वाघ, अभिजित खोसे, संभाजी पवार, बंटी काकडे, संदीप ठाणगे, पप्पू गरूडकर, अमोल सुरसे, अभिजित वाघ, विशाल वाघ, गणेश दातरांगे, मयुर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना वैभव वाघ म्हणाले की, रक्तदान ही लोकचळवळ व्हावी, यासाठी युवकांनी पुढे यावे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे या माध्यमातून अनेक रुग्णानां जीवदान मिळते, आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली रणसंग्राम प्रतिष्ठाने नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले.

No comments:

Post a Comment