स्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 22, 2021

स्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

 स्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वरांकित फौंडेशनमार्फत  आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य शिकविण्याचे ध्येय  असलेले युवा कलाकार ऋषिकेश कुलट यांनी आयोजित केलेल्या   ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.जिवनात कला आवश्यक असून त्यांनी स्वत: हि वाद्ये शिकण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या परिस्थितीत मानसिक आरोग्यासाठी वादन कला आवश्यक असून या कलेतून मिळणारे समाधान व आनंद अविस्मरणीय असतो याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. ढोलक ढोलकीचे प्रशिक्षण पुणे, मुंबई येथे उपलब्ध आहेत, मात्र तेथे जाणे व फी सर्वसामान्यांना परवडणारी नाही हे ओळखून पारंपारिक कला जोपासली जावी व या हेतूने अत्यंत माफक फी मध्ये प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.तसेच सध्या  500 विध्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत   अशी माहिती यावेळी ऋषिकेश कुलट यांनी दिली. तसेच सहभागी होण्यासाठी 9922809090 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेत तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदी वाद्या  विषयी सविस्तर व प्राथमिक माहिती देण्यात आली.लहानांपासून मोठ्यांना कळेल, समजेल अश्या सोप्या भाषेत तालवाद्य प्रशिक्षण देण्यात येणार असून कुठल्या गाण्यासाठी कुठले वाद्य आवश्यक असते याची माहिती काही  गाणी सादर करून यावेळी कुलट यांनी दाखवून दिले.यासाठी त्यांना गायिका कृतिका बेलेकर, कीबोर्ड वर नरेन साळवे व तालवाद्य वर आफताब मोगल यांनी साथ दिली. हॉटेल साई इन, सक्कर चौक येथे झालेल्या या  कार्यशाळेत सहभागी वाद्य प्रेमीना  मोफत ढोलक ढोलकी वाद्य उपलब्ध करून देण्यात आली होती. पाच वर्षाच्या बालकापासून ते वृद्ध व युवतींनीहि या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले व आभारही मानले. स्वरांकित फौंडेशनतर्फे ऋषिकेश कुलट आयोजित  ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.यावेळी सहभागीना मोफत वाद्य ही उपलब्ध करून प्रशिक्षण देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here