सदरीची कामे तातडीने मार्गी लावा- महापौर शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

सदरीची कामे तातडीने मार्गी लावा- महापौर शेंडगे

 सदरीची कामे तातडीने मार्गी लावा- महापौर शेंडगे

जुन्या जलकुंभाच्या दुरूस्ती व नविन पाण्याच्या टाकीची महापौरांकडुन पाहणी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मध्य शहर व उपनगरासाठी वसंत टेकडी येथून पाणी पुरवठा केला जातो. शहराची व उपनगराची वाढती लोकसंख्या पाहता पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वसंत टेकडी येथील जुनी पाण्याची टाकी तसेच अमृत पाणी पुरवठा योजनेमधून बांधण्यात आलेली टाकीची महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी काल पाहणी केली. अमृत योजनेमधून बांधण्यात आलेल्या नविन पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. नविन टाकीसाठी 14 मोटर बसविण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी तीन पाईप लाईन टाकण्यात आलेल्या आहेत. जुन्या पाण्याच्या टाक्या फार वर्षापूर्वीच्या असून त्या बर्‍याच ठिकाणी लिकेज झाल्यामुळे पाण्याची गळती मोठया होत आहे. त्यामुळे सदर पाण्याच्या टाक्या दुरूस्तीचे काम टप्प्याने 1 ते 2 दिवसात सुरू होणार आहे. शहरामध्ये व कल्याण रोड  या ठिकाणी पाणी पुरवठा कमी प्रमाणात व विस्कळीत झालेला आहे. जुन्या पाण्याच्या टाकीची लेव्हल 4 ते 5 फुटापर्यत ठेवणे आवश्यक आहे. परंतु लेव्हल राहत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. लेव्हल पट्टीची जागा बदलली आहे. सदर कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी यावेळी दिले
जलअभियंता निकम यांच्याकडून माहिती घेतली असता विळद पंपीग स्टेशन मधून वसंत टेकडीकडे पाणी पुरवठा होतो परंतु जुन्या पाण्याच्या टाकीसाठी पाईप लाईन मध्ये एअर धरल्यामुळे पाणी पाईप लाईन मधून पास होत नाही त्याचे शोध काम सुरू आहे. पाणी पुरवठा विभाग आज पहाटे पासून कोणत्या ठिकाणी दोष आहेत त्यामुळे पाणी पुरवठा सुरळी होत नाही यासाठी प्रयत्नशील आहे. 1 जुनी टाकी  लिकेज असल्यामुळे त्या 34 लाख लिटर टाकीमधून पाणी पुरवठा दुरूस्ती होईपर्यत होणार नाही असे सांगितले.
यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, शाम नळकांडे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, जलअभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी;सातपुते, अभियंता गणेश गाडळकर, सदाशिव रोहोकले, किशोर कानडे, श्रेयश कुलकर्णी  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment