मढी व मायंबा देवस्थानं रोप-वे ने जोडले जाणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 16, 2021

मढी व मायंबा देवस्थानं रोप-वे ने जोडले जाणार.

 मढी व मायंबा देवस्थानं रोप-वे ने जोडले जाणार.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशभरामध्ये नाथभक्तांची संख्या अगणित आहे. त्यांची नेहमीच नाथ असणार्‍या ठिकाणी दर्शनासाठी ये-जा असते. यापैकीच असणारे मढी व मायंबा देवस्थान नाथ भक्तांसाठी मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. आता नाथभक्तांच्या सोयीसाठी मढी व मायंबा देवस्थान रोप-वे ने जोडले जाणार आहे. दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार असून हा राज्यातील एकमेव उपक्रम ठरणार आहे.
गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. येथून जवळच नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी मायंबा (सावरगाव) येथे आहे.भाविक मढीवरून दहा किलोमीटरचा घाट रस्ता पायी चालत मायंबाला जातात. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव व यातून संपूर्ण परिसराचा होणारा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात यासाठी पुन्हा बैठक आयोजित केली जाणार आहे. दोन्ही देवस्थान समितीकडून संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.यासाठी सुमारे 45 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आ. सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली. मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, बबन मरकड, शिवजीत डोके आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here