भाजपचे 12 निलंबित आमदार पुन्हा एकत्र. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

भाजपचे 12 निलंबित आमदार पुन्हा एकत्र.

 भाजपचे 12 निलंबित आमदार पुन्हा एकत्र.

फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं.

मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर सर्व आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत कैफियत मांडली. दरम्यान आता पुन्हा एकदा हे बारा आमदार एकवटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी खलबतं सुरु आहेत. भाजपचे निलंबित 12 आमदार आज सकाळी 11 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत न्यायालयात जाण्यावर चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय. 12 आमदारांच्या निलंबनानंतर पुढे कायदेशीर पर्याय काय आहेत? कोर्टात बाजू कितपत टिकून धरेल, केरळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो, आदी बाबींवर यावेळी चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. असीम सरोदे यांनी निलंबित आमदार न्यायालयात गेल्यास काय होऊ शकतं यावर माहिती दिली. सभागृहातील अंतर्गत घडामोडींमध्ये दखल देण्याचे न्यायव्यस्थेलाही घटनात्मक अधिकार नाहीत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात जाऊन निलंबित आमदारांना खूप उपयोग होईल असं वाटत नाही, असं सरोदे म्हणाले.

No comments:

Post a Comment