भाजपाची प्रतिविधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 6, 2021

भाजपाची प्रतिविधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर बंद.

 भाजपाची प्रतिविधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर बंद.

महाविकास आघाडी सरकारने सदस्यांना सभागृहात बोलू न देता  आवाज दडपण्याचा केलेला प्रयत्न हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून,जनतेच्या प्रश्नासाठी भाजपाचे सर्व सदस्य रस्त्यावर उतरून सरकारच्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणणार आहे. कालच्या घटनेनं लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले.सदस्यांना बोलूच द्यायचे नाही आशी नवी परंपरा यांनी निर्माण केली.पण जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करू महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे.दूध उत्पादकांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नाही.पाच रुपये अनुदान कोणाच्या खिशात गेले? केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हेच शेतकर्यांच्या हिताचे असून उत्पादनापासून ते विक्री पर्यतच्या सर्व प्रक्रीयेत शेतकरी हित जोपासले आहे.राज्य सरकारचे कायदे हे राजकीय हेतूने प्रेरीत असून केंद्रात शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी सुरूवातीला हे कायदे आणले याचा सोयीस्कर विसर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण घालविण्यास राज्य सरकारच जबाबदार असून या सरकारचा निष्काळजीपणा समाजाला भोगण्याची वेळ आली आहे.पण भाजप आरक्षणाच्या प्रश्नावर स्वस्थ बसणार नाही.आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष सुरूच ठेवणार आहोत. - आ. राधाकृष्ण विखे पाटील


मुंबई -
राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तालिका अध्यक्षांच्या चेंबर आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामुळ तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 बड्या आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबीत केलं आहे. याचा निषेध करत भाजपने विधीमंडळाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारच्या कामाचा धिक्कार असो असा नारा दिला आहे. विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपने विधीमंडळाच्या पायर्‍यांवर प्रतिविधानसभा भरवली आहे. या प्रतिविधानसभेचे अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांना नियुक्त केलं आहे. अशी घोषणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिविधानसभेत सदस्यांना आपलं मत मांडण्याची संधी देण्याची विनंती केली आहे.विधीमंडळाच्या पायर्‍यांवर सुरु असलेली प्रतिवीधानसभा बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाजपकडून माईक आणि भाषणांचे थेट प्रसारण थांबवले. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सत्ताधार्‍यांनी कितीही दहशत केली आमचा आवाज बंद होऊ शकत नाही, बंद केला जाऊ शकत आम्ही या ठिकाणी सरकारचा विरोध करणार, विरोधात बोलणार आणि भ्रष्टाचार्‍यांच्या सदरा फाडणार त्यामुळे माध्यमांनी सहकार्य करावे, अध्यक्षांचा आदेश आहे सांगून माध्यमांना धक्काबुक्की केली आहे. ही एक प्रकारची आणीबाणी लावली आहे. आम्हाला बंदी केली तरी आम्ही प्रतिविधानसभा भरवणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सगळ्यांचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतुल काल खोटं आरोप करुन सदस्यांना निलंबन केलं आहे. शांतपणे आमचे प्रतिअधिवेशन सुरु होते. परंतु मार्शलांनी येऊन अधिवेशन बंद करुन माध्यमांवर दंडूकाशाही सुरु आहे. माध्यमांना त्रास देत असेल तर पत्रकार कक्षात आम्ही भाषण करु, आम्ही शांतपणे पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करणार आहेत. आम्ही लवकरच आयोजन करुन पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करु असा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
या महाराष्ट्रातील शेतकरी, ओबीसी राजकीय आरक्षण, विद्यार्थी आणि एमपीएससीचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर सरकारमध्ये आवाज उठवला तर खोट्या आरोपाखाली निलंबित करण्यात येत आहे. जे घडलेच नाही अशा गोष्टी सांगून खुर्चीवरुन खोटं बोलून आमदारांना निलंबित केलं जात आहे. म्हणून आज या विधानसभेत या सरकारचा धिक्काराचा प्रस्ताव ठेवतो आहे. हा जो प्रस्ताव मांडतो आहे तो सरकारच्या विरोधात विनंती करतो आहे की, या प्रस्तावावर चर्चा सुरु करावी आणि त्या संदर्भात अनेक सदस्यांना आपलं म्हणणं या सरकारच्या विरोधात, वसूली भ्रष्टाचार्‍यांचा पर्दाफाश करायचा आहे. सदस्यांनी नावे दिले आहेत त्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे. भास्कर जाधव यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेवर आक्षेप घेतला आहे. विधीमंडळ परिसरात खासगी पत्रक वाटण्याचा आणि अशाप्रकारे जमाव करुन स्पीकर लावून भाषण करण्याचा अधिकार आणि परवानगी कोणी दिली. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना चौकशी करण्याची विनंती केली आहे. पायर्‍यांवर विरोधी पक्षनेते आणि सदस्य बसले आहेत. त्या बसण्याला विरोध नाही परंतु त्यांच्याकडे स्पीकर आहे आणि ते भाषण करत आहेत. त्यांना अशा प्रकारची स्पीकरची परवानगी दिली आहे का? ही परवानगी दिली असेल तर त्याबाबत स्पष्टता द्या, अन्यथा ज्यांनी स्पीकर दिला असेल त्यांच्यावर कारवाई करा, विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांना बोलवले आणि त्यांना कारवाई करण्यास सांगितले तर कारवाई केली नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here