मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे.

 मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे.


मुंबई -
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती.काल अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागले होते. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 3 डिसेंबर 2019मध्ये ट्विट करून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी केली होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपले सरकार आले आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले होते. आता हा निर्णय घेण्यात आल्याबद्दल मराठा आंदोलकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment