पोलिसांकडून सावकारावर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

पोलिसांकडून सावकारावर गुन्हा दाखल.

 पोलिसांकडून सावकारावर गुन्हा दाखल.

अवैध्य सावकारकीचा फास... लाखाला प्रतिदिन एक हजार रुपये व्याज...


कर्जत-
आर्थिक परिस्थितीने ग्रासलेला माणूस पैशासाठी सावकारांच्या आश्रयाला जातो. सावकार जसं सावज असेल तसा व्याजदर आकारण्याचा निर्णय घेतात. ग्रामीण भागात अशा सावकारांच मोठं जाळं पसरलं आहे. व्याजाचा दर असा की ते कधीच ..... शकणार नाही. कर्जत मधील एका ट्रॅव्हल व्यावसायिकाला एक लाख रुपयाला प्रतिदिन एक हजार रुपये व्याज आकारणार्‍या एजाज उर्फ गोप्या सय्यद याच्याविरुद्ध कर्जत पोलिसांनी सावकारी व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने संदीप कळसकर यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडून ऑक्टोबर 2020 रोजी व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. या दोन लाख रुपयाला व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन 1 हजार रुपये लावण्यात आला. त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी कळसकर यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये घेतले. या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते. त्यानंतर आरोपीने व्याजावर चक्रवाढ व्याज रक्कम लावल्याने मुद्दल रक्कमही 6 लाख रुपयांवर गेली.
कळसकर यांनी व्याजापोटी 3 लाख रुपये दिले. 3 लाखांची रक्कम देऊनही 9 लाख रुपये आणखी द्यावे लागतील असे एजाजने सांगितले. तो पैसे वसूल करण्यासाठी गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ करु लागला. कळसकर यांच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून 2 कोरे धनादेशही घेतले. ’माझी सध्या पैसे देण्याची परिस्थिती नाही माझे व्याज माफ करा, मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो’ अशी विनंती केली. मात्र एजाजने काहीही ऐकले नाही. सावकाराच्या त्रासामुळे कळसकरांची मानसिक स्थिती खराब झाली . त्यानुसार संदीप कळसकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे गु.र.न.328/2021 भा.द.वि. कलम 341,504,506 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी केली. पुढील तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे हे करत आहेत. पोलीस निरीक्षक यादव यांच्या मोहिमेने गोरगरीब, सर्वसामान्यांची होणारी लूट थांबली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
‘कुणीही अवैध सावकारकी करुन कोणत्याही नागरिकाला वसुलीसाठी वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ करणे, वस्तू उचलून नेणे अथवा इतर कोणत्याही प्रकारचा त्रास देत असाल तर याद राखा.  असा इशारा चंद्रशेखर यादव, कर्जतचे पोलीस निरीक्षक यांनी दिला आहे. सावकाराकडून असा कोणताही प्रकार होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा. कोणत्याही तक्रारदारास सावकाराकडून कसलाही त्रास होणार नाही याची पोलीस काळजी घेतील असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here