गुंडेगाव येथे चोरी, किराणा दुकान फोडले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

गुंडेगाव येथे चोरी, किराणा दुकान फोडले..

 गुंडेगाव येथे चोरी, किराणा दुकान फोडले..

नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः हराळमळा  येथील नानासाहेब रंगनाथ हराळ  यांचे किराणा दुकान ( 11जुलै) रोजी    मध्यरात्री चोरट्यांनी फोडून रोख रक्कम सह मोटार सायकल चोरी गेल्याचे फिर्यादीत नोंदवले आहे. यामुळे गुंडेगाव परिसरातील व्यावसायिक घबराटीचे वातावरण निर्माण झाले . गाव परीसरात घरफोडी, दुकानफोडी, शेतवस्तीवर भुरट्या चोरटयाचा डल्ला मारणे सुरुच आहे. यामुळे नागरीकात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटना घडल्या होत्या यासंदर्भात नगर तालुका पोलिस स्टेशनमार्फत गस्त घालण्याची सुरूवात केली होती पण ती गस्त काहीच दिवस घालण्यात आली. गुंडेगाव येथे सुरक्षितेसाठी कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी गुंडेगाव उपसंरपच संतोष भापकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment