संभाजी ब्रिगेडच्या ऑफरला खा.संभाजी राजेंचे उत्तर... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

संभाजी ब्रिगेडच्या ऑफरला खा.संभाजी राजेंचे उत्तर...

 संभाजी ब्रिगेडच्या ऑफरला खा.संभाजी राजेंचे उत्तर...

मला मुख्यमंत्री व्हायचे नाही...


बीड ः
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यात आरक्षण जनसंवाद दौरा सुरू केला आहे. यावेळी संभाजीराजे यांनी संवाद साधत असताना मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा असे वक्तव्य केले होते. त्यावर संभाजी ब्रिगेडने संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडुन संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावे. आम्ही खासदार संभाजीराजेंना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असे आवाहन संभाजी ब्रिगेडने संभाजीराजेंनाकेल्यानंतर
मात्र त्यांनी लगेचच ’मला मुख्यमंत्री व्हायचं नाहीये. सर्व बहुजन समाजातील लोकांना न्याय देणार आहे. माझा शब्द आहे बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका संभाजीराजेंची असणार आहे.’ असे वक्तव्य करत मुख्यमंत्री होण्याबाबत खुलासा केला.बीडच्या कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा, असे म्हटले होते. तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिले होते परंतु संभाजी राजे यांनी बहेजन समाजाला न्याय देण्याची भुमिका विषद केली आहे. ’मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसींमध्ये आरक्षण द्या हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा, मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारला. पालकमंत्र्यांना हा प्रश्न विचारा. ते कोणीही उत्तर देणार नाहीत. मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा.’ असे वक्तव्य संभाजीराजेंनी बीडच्या संवाद यात्रेवेळी केले. त्यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांनी तुम्ही ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण का मागत नाही असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले.

No comments:

Post a Comment