शारदा दळवी यांनी स्वीकारला आष्टी तहसीलदारपदाचा पदभार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

शारदा दळवी यांनी स्वीकारला आष्टी तहसीलदारपदाचा पदभार

 शारदा दळवी यांनी स्वीकारला आष्टी तहसीलदारपदाचा पदभार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः तहसीलदार रामभाऊ कदम हे गेल्या महिन्यापासून दीर्घ रजेवर गेल्याने आष्टी तहसील चा कारभार पाटोदा तहसीलदार रमेश मुनलोड यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु आष्टी आणि पाटोदा हे अंतर जास्त असल्याने व आष्टी तालुक्याचे क्षेत्र मोठे असून दोन्ही तालुक्याचे पदभार सांभाळणे शक्य होत नसल्याने  जिल्हा अधिकारी तुषार ठोंबरे यांनी आष्टीच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे तहसीलदार पदाचा प्रभारी पदभार दिला आहे.

रामभाऊ कदम हे गेल्या महिन्यापासून घरगुती अडचणी चे कारण देत रजेवर गेल्याने आष्टी तहसीलदार पद हे पाटोद्याच्या तहसीलदारांना अतिरिक्त पदभार दिला होता परंतु दोन्ही तालुक्याचा पदभार सांभाळणे शक्य नसल्याने जिल्हा अधिकारी तुषार ठोंबरे यांनी आष्टीच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे पदभार सोपविला आहे. श्रीमती शारदा दळवी ह्या गेल्या तीन वर्षापासून नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्यावर्षी ही दोन महिने तहसीलदार म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली होती

No comments:

Post a Comment