श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज मंदिर परिसरात श्रमदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 7, 2021

श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज मंदिर परिसरात श्रमदान

 श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज मंदिर परिसरात श्रमदान


आष्टी (प्रतिनिधी) ः
तालुक्यातील वाहिरा येथे एकादशी निमित्त श्री संत शिरोमणी शेख महाराज मंदिर परिसरातील आदर्श माता फुले उद्यान या ठिकाणी श्रमदान करण्यात आले.
यावेळी श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज, पंचायत समिती सदस्य दादासाहेब झांजे, उपसरपंच सतीशराव आटोळे,  सतीश चंदिले, आबासाहेब मेटे, मोसीम महाराज शेख, प्रवीण आटोळे, सौ. वैजयंता पवार, गणेश माळशिकारे, संदीप झांजे,  केरु झांजे, मीराबाई आटोळे, कमलबाई झांजे, चंद्रकांत बोरकर, अर्जुन आटोळे, पारूबाई झांजे, रखमाबाई झांजे, उज्वला झांजे, शहाबाई झांजे, सुनिता झांजे आदींसह भाविकांनी श्रमदान केले.
मागील महिन्यात चांगला पाऊस झाल्याने उद्यानात मोठ्या प्रमाणात अनावश्यक गवत उगवले होते. म्हणून एकादशीनिमित्त सकाळी माहाआरती झाल्यानंतर श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद दिला. म्हणून संत शिरोमणी शेख महंमद महाराज मंदिर परिसरातील आदर्श माता फुलाई उद्यान येथे स्वच्छता करण्यात आली असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here