हनी ट्रॅप प्रकरणी महिलेसह एक आरोपी अटकेत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 15, 2021

हनी ट्रॅप प्रकरणी महिलेसह एक आरोपी अटकेत.

 हनी ट्रॅप प्रकरणी महिलेसह एक आरोपी अटकेत.


अकोला -
नगर मधील हनीट्रॅपची काही प्रकरणे ताजी असताना अकोल्यातील आणखी एक हनीट्रॅपचे प्रकरण उघडकीस आले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचे आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचे, लाखो रुपयांची मागणी करायची आणि नाही दिले तर चारचौघात मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दहशत निर्माण करायची असा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात अनेक दिवसापासून सुरू आहे.
असाच  प्रकार अकोले येथील एका प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर घडला. याबाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेरच्या एका महिलेने अकोले तालुक्यात एका प्रतिष्ठित व्यक्ती फोन केला साहेब जेवण झालं का चहापाणी झालं का अशी विचारणा करून थेट लगेच सुरू केली. त्यानंतर यांच्यात चर्चा रंगली कालांतराने व्हाट्सअप चॅटिंग आणि लागलीच एक महत्त्वाचे काम आहे असे म्हणून आठवड्याभरात संगमनेर येथे भेटण्यासाठी बोलावले . हॉटेलवर नको माझ्या अमुक अमुक मैत्रिणीचा फ्लॅट  आहे तेथे आपण जाऊन  महत्त्वाची चर्चा करू. त्यांनी या व्यक्तीला फारच विनंती केल्यावर ते फ्लॅटवर गेले.  तेथे गेल्यानंतर जरावेळ गप्पा मारून झाल्या आणि  म्हणालया  की माझ्या मैत्रिणीला तुम्ही खूप आवडता,त्यामुळे तिची शारीरिक भूक  भागवा यावेळी या गृहस्थाने नकार दिला असता या महिलांनी त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तुम्ही जर माझ्या मैत्रिणीशी आम्ही सांगू तसे केले नाही,तर आम्ही येथे आरडाओरडा  करू आणि लोकांना सांगू की तुम्ही आमच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.  तुम्ही संभोग केला नाही तर, लगेच पोलिसांना बोलावून तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू.  त्यामुळे अखेर हतबल होऊन त्या व्यक्तीकडून नको ते कृत्य करून घेतले हा प्रकार घडल्यानंतर ते त्यांच्या घरी निघून आले.
मागे या महिलांनी त्या गृहस्थाचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढला होता. रात्रीपासूनच त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली दोन लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा हा व्हिडीओ आम्ही व्हायरल करू या प्रकारामुळे हा व्यक्ती पूरता घाबरून गेला आत्महत्या करावी की पैसे देत राहावे असा संभ्रम निर्माण झाला.  दरम्यान हतबल झालेला व्यक्ती प्रचंड तणावाखाली आला होता.  मात्र ही महिला त्यांना शोधत शोधत त्यांच्या घरी आली प्रकरण अधिकच वाढत चालल्याचे  लक्षात येताच त्यांनी संगमनेर गाठले  यावेळी संबंधित महिलेने त्यांचा मोबाईल काढून घेताना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली तर दोन लाख रुपये यांची मागणी करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.  त्यावेळी या महिलेने धिटाई करून त्यांच्याकडून दोन वेगवेगळ्या एटीएम मधून तीस हजार रुपये काढून घेतले  हे पैसे घेताना देखील व्हिडिओ काढण्यात आला.  उर्वरित रक्कम आल्यावर पुरावे डिलीट करू असे सांगण्यात आले . या हनीट्रॅप मधील   बरेच पुरावे पिडीत व्यक्तीकडे  आहे ही रक्कम घेतल्यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीस पुढील वायदा केला होता ,त्यामुळे तो प्रचंड तणावात होता.  आता त्याच्या पुढे दोनच पर्याय उरले होते एकतर आत्महत्या करणे किंवा सर्व घडलेला प्रकार पोलिसांपुढे कथन करणे तेव्हा सर्व प्रकार अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना  सांगितले असता त्यांनी प्रथम का धीर दिला. त्यामुळे जर तुम्ही धैर्याने पुढे आला तर अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचेल  कारण या महिला फार प्रोफेशनल असल्याचे त्यांना सांगण्यात आले थोडा त्रास होईल पण अनेक उद्ध्वस्त होणारे संसार तुमच्यामुळे वाचतील  त्यामुळे पीडितव्यक्तीने  फार मोठे पाऊल उचलून त्यांना साथ दिली पोलिसांची मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्या मुळे व्यक्तीने केवळ आपण बळी गेलो म्हणून अन्य तरुण आणि पुरुष महिला शिकार होऊ नयेत यासाठी स्वतः पुढे येऊन फिर्यादी होत, महिला व तिच्या बरोबर असणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी उघड केला असून मूळ व्यक्तीने फिर्याद दाखल केली, आता अशा प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी स्वतः पुढे येऊन आपले पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
पैशाची चटक लागलेल्या या महिलेने मंगळवारी 13 जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फोन केला की जर आज दुपारी मला पैसे दिले नाहीत तर मी व्हिडिओ व्हायरल करेल असे म्हणून ब्लॅकमेलिंग केले.  त्यानंतर पीडित व्यक्तीने  याबाबत पोलिस अधिकारी घुगे यांना माहिती दिली.  घुगे यांनी  त्यांची एक टीम सुगाव  फाटा येथे तैनात केली आणि मंगळवारी दुपारी तीन वाजता या महिलेला तेथे बोलावण्यात आले.  दरम्यान ब्लॅकमेलिंग करून दहा हजार रुपये वसूल केल्या प्रकरणी पंचांसमक्ष तिला  ताब्यात घेण्यात आले, तर तिच्या सोबत असणारे रावसाहेब पंढरीनाथ सटाले राहणार संगमनेर आणि एक महिला यांच्यासह सहा लाख बावीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे . या हनीट्रॅप प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here