‘म. फुले जन आरोग्य योजने’साठी 300 अर्ज दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

‘म. फुले जन आरोग्य योजने’साठी 300 अर्ज दाखल.

 ‘म. फुले जन आरोग्य योजने’साठी 300 अर्ज दाखल.

मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना मिळावा यासाठी मनसेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातून 300 रुग्णांनी या योजनेसाठी अर्ज केल्याची माहिती मनसे सचिव नितीन भुतारे यांनी दिली असून राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हॉस्पिटल प्रशासनांना हे अर्ज निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये लाभ मिळावा याकरिता सर्व कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांचे बिले परत देण्यासाठी मनसेने आव्हान केल्यानंतर जवळपास जिल्ह्यातून 300 अर्ज हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सादर झाले आहेत. यामध्ये सर्व रुग्णांनी ज्या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ मिळतो आशा हॉस्पिटल मध्ये हे अर्ज सादर केलेले असून या संपूर्ण हॉस्पिटल कडून आपल्या उपचारावर खर्च झालेली रक्कम परत मिळविण्याकरता व शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्याकरिता मनसे प्रयत्नशील आहे.
ज्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये उपचार सुरू होते परंतु या सर्व हॉस्पिटलने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना माहिती दिली नसल्यामुळे या सर्व रुग्णांना कोरोना आजारावर उपचार करण्याचा खर्च व त्याचा त्रास सहन करावा लागला आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोरोना आजारावर मोफत उपचार होत असल्यामुळे संबंधित हॉस्पिटलने कोरोना आजारावर उपचार घेणार्‍या रुग्णांकडून पैसे आकारू नयेत तसेच या रुग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील हॉस्पिटल मध्ये ज्या रुग्णांनी कोरोना आजारावर उपचार घेतले अशा रुग्णांचे पैसे सुद्धा परत मिळू शकतात असे आवाहन केल्यानंतर ही सर्व बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केल्यानंतर व महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपल्याला सर्व रुग्णांना लाभ मिळू शकतो असे आवाहन केल्यानंतर एक ते दीड महिन्यात जिल्ह्यातून व शहरातून 300 अर्ज हे दाखल झालेले आहेत व त्यामध्ये नगर शहरातील जवळपास 210 अर्ज या योजनेमध्ये पाच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे नगर  शहरातील नोबेल हॉस्पिटल 80 अर्ज सादर झाले आहेत आनंद ऋषीजी हॉस्पिटल 47, अर्ज साईदीप 43 अर्ज, स्वास्थ्य हॉस्पिटल 12 अर्ज, अनभुले हॉस्पिटल 2 अर्ज, विखे पाटील विळद घाट हॉस्पिटल 35 अर्ज दाखल झाले आहेत.
एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना उपचाराकरिता बेड मिळत नसल्या मुळे हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना आजारावर मोफत उपचाराची सोय सुविधा असताना देखील कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती विचारल्या नंतर हॉस्पिटल कडून तुम्हाला बेड मिळेल परंतु योजनेचा लाभ मिळणार नाही असे. लेखी अर्ज तुम्हाला द्यावे लागतील त्यानंतर तुमच्यावर उपचार केले जाईल अशा धमक्यांचे प्रकार व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार अनेक हॉस्पिटलकडून घडल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळे अशा सर्व अर्जदारांना बरोबर घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून संबंधित महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा गैरवापर करणार्‍या तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत कोरोना आजारावर रूग्णांना उपचार नाकारणार्‍या व सर्वसामान्य रुग्णांची गोरगरिबांची तसेच शासनाची फसवणूक करणार्‍या हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे अशी माहिती मनसेचे. नितीन भुतारे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment