सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या 100% निकालाची परंपरा कायम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या 100% निकालाची परंपरा कायम

 सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या 100% निकालाची परंपरा कायम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
येथील तारकपूर रोडवरील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील 10वीच्या परीक्षेसाठी एकूण 87 विद्यार्थी बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, स्कूलने दहावीच्या 100% निकालाची यंदाही कायम राखली आहे. 12 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक मिळविले असून, 49 विद्यार्थी डिस्टिंशन, तर प्रथम श्रेणीत 36 व द्वितीय श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सेक्रेटरी दामोधर बठेजा, विश्वस्त दामोधर माखिजा, रूप मोटवाणी, रामचंद मेंघानी, अमरलाल तलरेजा आदींनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी, शिक्षिका सीमा कोटस्थाने, शिरीन शेख, इशरत शेख, तसनीम हकीमजीवाला, रुचिता सारडा, मनीषा आहुजा, शिक्षक अमोल धोपावकर, बी. बी. गुंजाळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत पूर्वा सातपुते (97.40%) गुण मिळवून प्रथम, समाहेर हिल्स (96.60%) द्वितीय, अथर्व बोडखे व श्रीराज जमभाळे (96.40%) गुण मिळवून तृतीय आले आहेत, तसेच ट्विंकल कटारिया (95.40%) चौथी व मधुरा कुलकर्णी (94.80%) पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. सिंधी समाजातील मुलींमध्ये ट्विंकल कटारिया (95.40%) व मुलांमध्ये मयूर छुट्टाणी (88.80%) गुण मिळवून टॉपर्स ठरले आहेत.
यावेळी स्कूलचे सेक्रेटरी दामोधर बठेजा म्हणाले की, स्कूलच्या प्राचार्या, उपप्राचार्या, मुख्याध्यापिका, तसेच शिक्षक व शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन दहावीच्या परीक्षेत स्कूलची 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतरही उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न स्कूलकडून केला जातो, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here