वनीकरणाच्या झाडांची कत्तल करत, जमीन हडपण्याचा गोरखधंदा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

वनीकरणाच्या झाडांची कत्तल करत, जमीन हडपण्याचा गोरखधंदा

 वनीकरणाच्या झाडांची कत्तल करत, जमीन हडपण्याचा गोरखधंदा

पाचुंदे ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः नेवासे तालुक्यातील पाचुंदे गावाच्या सरकारी मालकीच्या वनिकरणातील मोठमोठ्या झाडांची बेछुट कत्तल केली जात असुन,सरकारी मालकीची जमीनच संबधित शेजारचे रहिवासी शेतकरी स्वत:च्या जमिनीला जोडत असल्याचा प्रकार सुरूअसल्याने तसेच संबधित शासकीय विभागास वेळोवेळी पुर्वकल्पना देऊन ही याबाबत उपाययोजना होत नसल्याने,समस्त ग्रामस्थां नी यापुढे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषणास, बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.                  
याबाबत असे की, पाचुंदे येथील शेती शिवार गट नं. 204 मधील 5 हेक्टर 79 गुंठे सरकारी जमीनीवर शासकीय निधीतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन 2016, 17, 18, 19 या वर्षी वृक्षलागवड करण्यात आली.अलिकडच्या काळात वनिकरणाच्या लगत असलेल्या शेजारच्या रहिवासी शेतकरयांकडुन, आधुनिक यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करत,सरकारी जमिनीचा वापर आपल्या नजीकच्या शेतजमीनित विलीन करण्याचा प्रयत्न सुरूच असल्याने,याबाबत यापुर्वी ग्रामस्थांनी संबधित शासकीय विभागास लेखी पुर्व कल्पना देऊनही लक्ष देण्याची गरज असता, जाणुन बुजुन की काय कोण जाणे आजपर्यंत यासंदर्भात कुठल्याच बाबतीत संबधित खात्याने लक्ष न दिल्याने, ग्रामस्थांपुढे दुसरा पर्याय उर्वरीत नसल्याकारणाने, ग्रामस्थांनी सह्या करून, लेखी निवेदनही संबधित शासकीय विभागास दिले असुन ठोस उपाय योजना केली नाही. त्वरित यासंदर्भात लक्ष न दिल्यास कोरोनाबाबत नियम व सूचनांचे पालन करुन वेळप्रसंगी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर, आता, कुठल्याच बाबतीत पुर्वकल्पना न देता, मोठ्या संख्येच्या उपस्थितीत उपोषणास बसणार असल्याचा सज्जड ईशारा ग्रामस्थांनी दीला आहे.  

गावातील सरकारी मालकीच्या जमिनीत असलेल्या वनिकरणातुन मोठमोठ्या झाडांची तोडणी करून झाडांची विक्री होत असता तसेच, हि जमीन शेजारच्या शेतकरयांनी आपल्या स्वतःच्या शेतीला जोडल्याने, वेळोवेळी पुर्वकल्पना देऊनही शासकीय मालमत्तेचे संरक्षण करण्यात शासन दुुुर्लक्ष करत असल्याने, भविष्यात वनीकरण व सरकारी जमीन नामषेश होईल. संबंधित शासकीय विभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक असुन न दिल्यास कोरोनासंदर्भात सर्व नियम व सूचनांचे पालन करुन योग्य मार्गे उपोषणास बसणार आहोत._ एकनाथ रांजु माने.                                            
   - शहाजी मेसु पठारे, 
- तसेच इतर ग्रामस्थ पाचुंदे      

No comments:

Post a Comment