गॅस आला पण आता सिलेंडरसाठी पैसे आणायचे कुठून? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

गॅस आला पण आता सिलेंडरसाठी पैसे आणायचे कुठून?

 गॅस आला पण आता सिलेंडरसाठी पैसे आणायचे कुठून?

उज्वलाच्या घरोघरी पुन्हा पेटल्या मातीच्या चुली...


नेवासा -
अहमदनगर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळ असलेल्या नेवासा तालुका हा जरी बागायती ओळखला जात असला तरी या भागातील महिला उज्वला योजनेच्या लाभार्थी ठरले आहे. त्यांनी शंभर रुपये गॅस एजन्सीमध्ये भरून उज्वला चे स्टिकर असणारे गॅस चे कार्ड, शेगडी आणि सिलेंडर त्यांना मिळाली. परंतू, सध्याच्या माहागाई मध्ये सिलेंडर परवडत नसल्याने उज्वलाच्या घरी उज्वला योजनेचा तालुक्यातील बराच धूर निघत आहे.
 ग्रामीण भागातील बहुसंख्य कुटुंबात मातीच्या चुलीवर स्वयंपाक केला जातो त्यासाठी लाकूड  कोळसा, शेणाच्या गौर्‍या याचा वापर केला जातो त्यातून निघणारा धूर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो या भानगडीत 850 ते 900 रुपये देऊन गॅस घेणे त्यांना परवडत नाही म्हणून त्याचा नाद सोडूनच आता घरोघरी मातीच्या चुली पेटलेल्या दिसत आहेत.
केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला योजना सुरू केली समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत गॅस पोहोचवण्याची योजना सरकारने आखली उज्वला गॅस योजना सुरू झाली त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी देण्यात आली या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस जोडणी मिळाली परंतु सिलिंडरमधील गॅस संपल्यावर नवीन सिलेंडर घेण्यासाठी गरीब कुटुंबाकडे पैसे नाहीत स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लाकडाचा होणारा वापर कमी करणे जंगलतोड कमी होण्यास चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने ही चांगली योजना सुरू झाली
आर्थिक व जातीनिहाय जनगणनेत तयार करण्यात आलेल्या यादीतून योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाची निवड करण्यात आली या कुटुंबांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली घरात गॅस आल्याने गरीब कुटुंबातील महिलांना आनंद झाला त्यांनी उज्वला गॅस योजनेचा गाजावाजा केला परंतु आता दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या दरामध्ये होत असलेल्या वाढीमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले असून नवीन गॅस सिलेंडर घेण्यासाठी सद्यस्थितीत 850 ते 900 रुपये मोजावे लागतात सिलेंडरसाठी इतके पैसे मोजणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अल्पभूधारक, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करणार्या कुटुंबांना शक्य होत नाही. अशा गरीब कुटुंबांना परवडत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबातील महिलांनी पुन्हा स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घेतला असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
गॅसचा वापर केवळ चहा पुरता स्वयंपाक मात्र चुलीवर...
  पंतप्रधान मोदींजी उज्वला योजना चहा पूर्ती ठेवत सिलिंडरमधील गॅस संपू नये म्हणून स्वयंपाक चुलीवर आणि सकाळचे चहापाणी गॅसवर अशी उपाययोजना बहुतांश महिलांनी स्वीकारली आहे. परिणामी सिलेंडर भरून आणल्याने कुटुंबात स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करीत आहेत सिलेंडरची किंमत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गरिबासाठी असलेल्या योजनांचा फायदा त्यांना होत आहे किंवा नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment