मंत्री एकनाथ भाईंनी केले नगरच्या नगरसेवकाच्या त्या कामाचे कौतुक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

मंत्री एकनाथ भाईंनी केले नगरच्या नगरसेवकाच्या त्या कामाचे कौतुक

  मंत्री एकनाथ भाईंनी केले नगरच्या नगरसेवकाच्या त्या कामाचे कौतुक
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना लसीकरणाच्या कामात उत्कृष्ट नियोजन करून चांगले काम करणार्‍या अहमदनगर मधील काँग्रेस नगरसेवकाला शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शाब्बासकीची थाप देत कौतुक केले आहे. मंत्री एकनाथ भाईंचे पत्र हाती पडताच या नगरसेवकाच्या कामाला आणखी हुरूप मिळाले आहे. धनंजय जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. कोरोना लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी धनंजय जाधव यांनी सार्वजनिक गणेश मंडळामार्फत नियोजन केले. कोरोना लस घेऊ इच्छिणार्‍या नागरिकांच्या याद्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमार्फत जाधव यांनी तयार करून घेतल्या. सोडत पद्धतीने गणेश मंडळांना लस दिली. जाधव यांच्या या उपक्रमाची मंत्री शिंदे यांनी दखल घेत कौतुक केले आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून राबविलेली लसीकरण योजना कौतुकास पात्र आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रावरील गर्दी कमी होणार आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता झोकून देऊन काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. तुमचे हे कार्य राज्यात नावलौकिकास पात्र ठरेल अशा शब्दात मंत्री शिंदे यांनी धनंजय जाधव यांचे कौतुक केले आ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here