रोटरी प्रियदर्शनी क्लबने बसवले अमरधाम मध्ये नवे शवदहन स्टँड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

रोटरी प्रियदर्शनी क्लबने बसवले अमरधाम मध्ये नवे शवदहन स्टँड

 रोटरी प्रियदर्शनी क्लबने बसवले अमरधाम मध्ये नवे शवदहन स्टँड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अमरधाम मध्ये अंत्यसंस्कारासाठी शव दहन ओटे व स्टँड कमी पडत असल्याने नगर शहरात विविध सामजिक उपक्रम राबवणार्‍या रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या वतीने अमरधाम मध्ये नव्याने शव दहन स्टँड बसवण्यात आले आहे. क्लबच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी क्लबच्या बैठकीत मांडलेल्या प्रस्तावास सदस्या आशा फिरोदिया व डॉ. बिंदू शिरसाठ यांनी अनुमोदन दिले. सर्व सभासदांनी एक मताने प्रतिसाद देत सर्वांनी या प्रोजेक्टसाठी आर्थिक सहकार्य केले. जेष्ठ सदस्या प्रतिभा धूत, किरण धूत व  सुधा धूत मेमाणी यांनी विशेष सहकार्य केले.
उपक्रमाची माहिती देताना गीता गिल्डा म्हणाल्या, गेल्या वर्षापासून करोनाच्या संकटात रोटरी प्रियदर्शनी क्लब मदत कार्य करत आहे. नगर शहरात करोना महामारीत अनेकांनी आपले प्राण गमावले. एकाच दिवशी स्मशानभूमी मध्ये अनेकांवर अग्निसंस्काराचे दृश्य मन विषण्ण करणारे होते. दोन महिन्यापूर्वीचे हे चित्र आठवलं तरी काटा येतो. शव दहन स्टँड देण्याच्या या उपक्रमास प्रियदर्शनीच्या सर्व सभासदांनी केलेल्या सहकार्या बद्दल सर्वांचे आभार. त्यामुळेच प्रियदर्शनी क्लबच्या अध्यक्षा पदाच्या अखेरच्या टप्प्यात हे महत्वाचे सामाजिक कार्य करता आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here