जेथे निसर्ग तेथे आनंद ः स्थायी समिती सभापती अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

जेथे निसर्ग तेथे आनंद ः स्थायी समिती सभापती अविनाश घुले

 जेथे निसर्ग तेथे आनंद ः स्थायी समिती सभापती अविनाश घुले

आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त व कै.शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त रिक्षाचालक लावणार 500 झाडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील रिक्षाचालक पर्यावरण संवर्धनासाठी एकवटले असून,500 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. झाडांच्या माध्यमातून निसर्ग निर्मितीचे काम होते त्यामाध्यमातून मानवाला आनंद मिळतो त्याच बरोबर मानवी आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. रिक्षाचालकांत प्रमाणे शहरातील नागरिकांनी पुढे येऊन वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्यासाठी लोक चळवळ उभी करावी या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती होण्यास मदत होईल,अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातूनही शहरातील काही मुख्य रस्त्यावर वृक्षारोपणाची मोहीम हाती घेणार आहे.त्यामुळे शहराच्या सौंदर्य करणात भर पडेल असे प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी व्यक्त केले.
आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त व कै.मा.नगराध्यक्ष शंकरराव घुले यांच्या जयंतीनिमित्त रिक्षाचालकांकडून 500 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे या मोहिमेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्ष वाटून करण्यात आला यावेळी स्थायी समिती सभापती  अविनाश घुले,दत्ता वामन,विलास कराळे,लतीफ शेख, अशोक औशिक, गणेश पाटोळे,नंदू गायकवाड,निलेश कांबळे,पिंटू चव्हाण,आनंद तामसे,बाळू मोरे,धमक गायकवाड,गणेश सुपेकर,दत्ता शिंदे, अन्वर सय्यद ,राजू जरे,सतीश भांबळ, सुनील सकट,नासीर शेख,बाळू भोसले,राहुल पांढरे,महेश तळेकर, सागर बिडकर,उमेश पवार तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दत्ता वामन म्हणाले की,शहरातील रिक्षा चालक स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले आहे. सर्वांनी एकमुखाने ठराव करून वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प हाती घेतला असून 500 झाडे रिक्षा चालकांना देण्यात आली आहे. प्रत्येक रिक्षाचालकांनी एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here