मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 12, 2021

मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.

 मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.

ओंकार बाबासाहेब भालसिंग वाळकी खून प्रकरण..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील ओंकार बाबासाहेब भालसिंग यांची 17 नोव्हेंबर 2020 मध्ये मागील भांडणाचा राग धरून “ओंकार” दुचाकीवरुन जात असताना आरोपी विश्वजीत कासार व त्याचे साथीदारांनी समोरून धडक देवून खाली पाडून लोखंडी पाइप व दांडक्याने मारहाण केल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाला. स्थानिक गुन्हे शाखेने 302 चा गुन्हा नोंदवून तपास केला. या गुन्ह्यातील सर्व 6 आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम ‘मोक्का’ लावून मोक्का न्यायालयात 1320 पानांचे दोषारोपपत्र काल सादर केले आहे.
नगर तालुका पो.स्टे ग.ुर.नं 1123/2020 भांदा वीक 302,32,324,323,504,506,365,143,147,148,149,120(ब),212 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे विश्वजीत रमेश कासार वय 28 वर्ष रा. वाळकी, ता जि अहमदनगर, टोळी प्रमुख सुनील फक्कड अडसरे वय 26 वर्षे रां.शेडाळा ता आष्टी जि बीड, शुभम बाळासाहेब लोखंडे रा.करडे ता शिरूर जि पुणे, सचिन चंद्रकांत भामरे रा. खेतमाळीसवाडी पारगाव ता जि अहमदनगर, इंद्रजीत रमेश कासार वय 25 वर्ष रा.वाळकी ता जि अहमदनगर, मयूर बापूसाहेब नाईक वय 20 वर्ष रा.वाळकी ता जि अहमदनगर, भरत भिमाजी पवार वय 26 रा. साकत (दहिगाव) ता जि अहमदनगर, संतोष आप्पासाहेब धोत्रे वय 26 वर्षे रा.कारेगाव ता शिरूर जि पुणे, संकेत भाऊसाहेब भालसिंग रा. वाळकी ता जि अहमदनगर, (फरार) सचिन घुले रा. शिरूर ता शिरूर जि पुणे, (फरार) अन्वये दाखल भालसिंग खून प्रकरणात गुन्हाचा तपास नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत यांनी केला. त्यानंतर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व मिथुन घुगे यांनी केला.
या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांची कलमे लावण्याची मंजुरी मा.विशेष पोलिस निरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अहमदनगर व मा. अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग अहमदनगर, यांनी केला असून गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 01 टोळी प्रमुख असून त्याचे अधिपत्याखाली आरोपी क्रमांक 02 ते 10 यांनी गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी यातील आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची मंजुरी दिल्यानंतर यातील आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश, मोका न्यायालय अहमदनगर मा. न्यायालयात काल 1320 पानांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here