भाजपा शहराध्यक्ष पुत्राचं लसीकरण केंद्रात बर्थडे सेलिब्रेशन ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 3, 2021

भाजपा शहराध्यक्ष पुत्राचं लसीकरण केंद्रात बर्थडे सेलिब्रेशन !

 भाजपा शहराध्यक्ष पुत्राचं लसीकरण केंद्रात बर्थडे सेलिब्रेशन !

19 मे च्या वाढदिवसा बाबत मनसेची आयुक्तांकडे तक्रार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘वाढदिवस’ हा हितचिंतक मित्रपरिवार, कुटुंबाबरोबर साजरा करण्यासाठी आनंद उत्सवाचा दिन. कोरोना काळात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं थोडसं अवघड झालं असलं तरी या कोरोना काळात लसीकरण केंद्रावर वाढदिवस साजरा करण्याचं फॅड वाढलं आहे. आरोग्य अधिकारी यांचं वाढदिवसादिवशी गाण्यावर थिरकण, आरोग्य महिला कर्मचार्‍यांचा वाढदिवस लसीकरण केंद्रावर साजरा होणं या दोन घटना समोर आल्यानंतर काल भाजपा शहराध्यक्ष यांच्या मुलानं मुकुंद नगर येथील लसीकरण केंद्रावर 19 मेला वाढदिवस साजरा केल्याचं पुढे आल आहे. मनसेनं आयुक्तांकडे याबाबत तक्रार निवेदन दिले आहे.
भाजपाच्या शहराध्यक्षाच्या मुलाने  लसीकरण केंद्रातील कर्मचार्‍याचा वाढदिवस साजरा केला आहे  त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायाराल होत असल्याचे मनसेचे नितीन भुतारे यांनी हा प्रकार उघडीस आणला आहे. सर्वसामान्यांवर कारवाई करुण हजारो रुपयांची दंड वसुल करायचा आणि दुसरीकडे राजकिय नेते , नगरसेवक त्यांचे मुले, नातेवाईक असे बेफान वागतात त्याकडे मात्र लक्ष्य नाही भाजपा शहराध्यक्ष पुत्र व त्याच्या मित्रपरिवार 19 मे रोजी हा वाढदिवस साजरा करत असताना सोशल डीस्टनसिंग , मास्क, कुठेच वापरलेले दिसत नाही आरोग्य केंद्रात वाढदिवस साजरा करण्याच्या या प्रकरणास आयुक्तांनी याची चौकशी करून संबंधित भाजपा शहराध्यक्ष यांचा मुलगा व त्याच्या सहभागी मित्रांवर  कारवाई करावी अशी मागणी नितीन भुतारे हे आयुकांकडे करणार असून याच बरोबर वाढदिवसाची मालिका सूरू करणार्‍या आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांच्यावर सुध्दा कारवाईची मागणी मनसे कडून वारंवार कारण्यात येत आहे. नगरसेवक, राजकिय नेते लसीकरण केंद्र ताब्यात घेत आहेत ह्या मनसेच्या नितीन भुतारे यांनी केलेले आरोप कुठे तरी अश्या घटनांमुळे सिध्द होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment