दिव्यांगांसाठी स्वतंत्र्य लसीकरण केंद्र सुरु करावे - वसंत शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

दिव्यांगांसाठी स्वतंत्र्य लसीकरण केंद्र सुरु करावे - वसंत शिंदे

 दिव्यांगांसाठी स्वतंत्र्य लसीकरण केंद्र सुरु करावे - वसंत शिंदे

रुद्र अपंग संघटनेची जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील बरेच दिव्यांग हे कोरोनाच्या महामारीत बळी पडले आहेत. लसीकरण केंद्रावर असलेली गर्दीे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रही लांब असल्याने दिव्यांगाच्या लसीकरणापासून वंचिंत आहेत. तेव्हा दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र किंवा आठवड्यातील एक दिवस ठरावून द्यावा, या मागणीचे निवेदन रुद्र अपंग संघटनेच्यावतीने जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.वसंत शिंदे,  महिला  जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सरचिटणीस  विजय पडोळे  आदि उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या कोरोनामुळे अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश आहे. शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर सर्वांना लस देण्यात येत आहे. या लसीकरण केंद्रावर नावनोंदणी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, रांगा लावणे, लस उपलब्ध नसणे असे  दरवेळी वेगवेळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यात दिव्यांचे तर मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे  दिव्यांगांसाठी ग्रामीण भागात स्वतंत्र्य  लसीकरण केंद्र किंवा आठवड्यातील एक दिवस फक्त दिव्यांगांसाठी देण्यात यावा. याबाबत संघटनाही पुढाकार घेण्यास तयार असून, दिव्यांगाना लसीकरण केंद्रावर आणणे-नेण्याची व्यवस्था संघटनेच्यावतीने करण्यात येईल. प्रारंभी प्रायोगिक तत्वावर नगर तालुक्यातील शेंडी-पोखर्डी भागात  हे लसीकरण  केंद्र सुरु करावे. टप्प्याटप्याने जिल्ह्यात अशी विनंती आहे. एकतर कोरोना, लॉकडाऊन त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, त्यात कोरोना झाल्यास दवाखान्यांचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने दिव्यांगांचे तातडीने लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी संघटनेच्यावतीने सहकार्य केले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी आरोग्य अधिकारी म्हणाले, टप्प्याटप्प्यांने सर्वांचेच लसीकरण करण्यात येणार असून, उपलब्ध लसीनुसार नियोजन केले जाते. दिव्यांगांच्या अडचणी लक्षात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष महेश विभुते, अनिल सोनवणे,  जिल्हा सचिव बापू पांडूळे, महिला जिल्हा सरचिटणीस दिपाली पडोळे, महिला संघटक बेबीताई देवकर, नगर तालुकाध्यक्ष रामेश्वर तुपे, संतोष शेंडगे आदिंसह पदाधिकार्यांनी ही मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here