वाघवाडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

वाघवाडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ

 वाघवाडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ




नगरी दवंडी /प्रतिनिधी 

अहमदनगर : नगर तालुक्यातील वाघवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रोख रक्कम व सोन्याच्या ऐवजाची चोरी केली आहे.

   आण्णासाहेब शिंदे यांच्या घरातुन ५ हजार रुपये रोख व १तोळे सोन्याची चोरी झाली आहे. अशोक विटकर यांचे १० हजार रुपये चोरुन नेण्यात आले. तसेच नंदु धनवटे, ज्ञानदेव धनवळे, ज्ञानदेव विटकर, नामदेव विटकर, नवनाथ येवले यांच्या घराचे कुलूप तोडून कपड्यांची चोरी झाली आहे. नागरीक जागे झाल्याने अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धुम ठोकली.

     घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीसांनी गस्त वाढवावी तसेच जेऊर गावात ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तू डोकडे, एकनाथ वाघ, साहेबराव वाघ यांच्या सह ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment