आडतेबाजार व दालमंडई मधील व्यापार्‍यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद - आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

आडतेबाजार व दालमंडई मधील व्यापार्‍यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद - आ. जगताप

 आडतेबाजार व दालमंडई मधील व्यापार्‍यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद - आ. जगताप

दाळमंडई, आडतेबाजार येथील दुकाने संध्याकाळी 6 नंतर बंदचे भिंती पत्रकाचे अनावरण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोका टाळण्याच्या हेतून दाळमंडई मधील व्यापार्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मागील एक वर्षापासून व्यापार्यांनी प्रशासनाच्या वेळोवेळी सर्व आदेशाचे पालन करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. काळाचे पाऊल ओळखून व्यापार्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. व्यापार्यांनी टाळेबंदीत सर्वकाही बंद असताना देखील योगदान देऊन गरजूंची मदत केली. संकटकाळात खांद्याला खांदा लाऊन कार्य केले. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन व सामाजिक भान ठेऊन घेतलेल्या निर्णयाचे इतर व्यापारी वर्ग देखील अनुकरण करतील अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
कोरोनाची दुसर्या लाटेनंतर नगर शहरातील सर्व बाजारपेठ चालू करण्यात आली असून, दाळमंडई, आडतेबाजार येथील व्यापार्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने संध्याकाळी 6 वाजता बंद करण्याचा स्वयंफुर्तीने निर्णय घेतला आहे. यानिमित्त आमदार जगताप यांनी व्यापार्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. यावेळी  नगरसेवक सचिन जाधव, निखिल वारे, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, संजय चोपडा, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, डॉ. विजय भंडारी, सतीश लोढा, अजित गुगळे, शाम सचदेव, सचिन कटारिया, मनोज रांका, मनोज शेटीया, अशोक भंडारी, राजेंद्र अगरवाल, संतोष ताथेड, राजेंद्र डागा, संजय लोढा, धीरज कोठारी, हमाल पंचायतचे सांगळे, बाळासाहेब वायभासे आदींसह व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार जगताप पुढे म्हणाले की, कोरोनाने खूप काही शिकवले असून, व्यापार्यांनी शिस्तबध्द नियोजन करुन आपल्या व इतर नागरिकांच्या आरोग्य जपण्याचे काम केले. हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दाळमंडई येथील व्यापार्यांनी स्वयंशिस्त पाळून एक आदर्श निर्माण केला आहे. बाजारेपठ सुरु होण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला.  हमाल कष्टकरी कामगारांनी कोरोना काळात मागील एक वर्षापासून कुठल्याही अडीअडचणी न आणता व्यापारी सांगतील त्यावेळेस कामावर येऊन काम केले. व्यापारी व हमाल वर्ग बाजारपेठेच्या रथाचे दोन चाके आहेत. व्यापार्यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचे हमाल बांधवांचा देखील सहकार्य असणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तविक असोसिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी केले. दाळमंडई, आडतेबाजार येथील दुकाने संध्याकाळी 6 नंतर बंदचे भिंती पत्रकाचे अनावरण करुन  सर्व व्यापारी वर्गाला भिंतीपत्रकाचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment