‘काँग्रेसला ‘महापौर’ पद हवे! आ.जगतापांशी पंगा कशाला? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

‘काँग्रेसला ‘महापौर’ पद हवे! आ.जगतापांशी पंगा कशाला?

 ‘काँग्रेसला ‘महापौर’ पद हवे! आ.जगतापांशी पंगा कशाला?

काँग्रेस नेते बाळासाहेब भुजबळांचा पक्षश्रेष्ठींना सवाल?

एकीकडे आमदार जगताप यांनी आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला महापौरपदासाठी सहकार्य द्यावे असा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ठराव करतात आणि ठराव करताना काँग्रेसचे संबंधित नगरसेवकांनाही डावलतात. मनपातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनपा काँग्रेस गटनेते व संबंधित काँग्रेस नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करणे गरजेचे आहे, पण तशी बैठक अद्याप झालेली नाही, एकीकडे सहकार्य मागणे आणि दुसरीकडे विवाद करणे यामुळे ना.बाळासाहेब थोरात यांच्या अपेक्षेप्रमाणे पक्षाच्या सौ.शीला चव्हाण यांना महापौर पद मिळेल का ? असा सवाल उपस्थित होतो. श्री दीप चव्हाण यांना यापूर्वी नगरपालिका असतांना नगराध्यक्ष करण्याच्या प्रयत्नात प्रामुख्याने तत्कालीन काँग्रेस नेते ब्रिजलाल सारडा , स्व.कृष्णा जाधव, उस्मानशेठ चमडेवाले यांचा पुढाकार होता.तत्कालीन पालिकेत आ.अरुण काका जगताप यांच्या गटाचे संख्याबळ त्यावेळीही मोठे होते.सारडा यांच्या सूचनेवरून आमदार जगताप यांनी श्री चव्हाण यांना पाठिंबा देऊन नगराध्यक्ष पदावर विराजमान केले होते. त्याची पुनरावृत्ती आज होऊ शकते व शीला चव्हाण महापौर पद प्राप्त करू शकतात परंतु किरण काळे आ. संग्राम जगतापांशी वाद करून काय साधणार आहेत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  काँग्रेसच्या नगर शहर जिल्हाध्यक्षांनी विवाद करण्याऐवजी सुसंवाद करण्याची गरज आहे.पक्षाच्या हिताला बाधा आणणारी कृती करणार्‍या किरण काळे यांच्यावर खरतर निलंबनाची कारवाई करावी. जेणेकरून दीप चव्हाण काँग्रेस नगरसेवकांसह आ.संग्राम जगताप यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्यात सुसंवाद आहे, तो कायम राहील. आणि शहरातील काँग्रेस पक्षातील दुफळीही नष्ट होऊन नामदार थोरात यांचे नेतृत्व मानणारे सर्व कार्यकर्ते पुन्हा एकत्र येतील. पक्षाला पुन्हा नगरमध्ये वैभव प्राप्त होईल. महापौर निवडणुकीची व्यूहरचना सुरू असताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा आ. जगताप यांच्याशी विवाद करण्याचा प्रयत्न योग्य आहे का असा सवाल शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांनी पक्षश्रेष्ठींना केला आहे.काँग्रेसचा महापौर करायचा असेल,तर आ. संग्राम जगतापांशी पंगा कशाला ? असेही ते म्हणाले नगरचा आगामी महापौर  काँग्रेस पक्षाचा व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष पदावर असताना ना बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. आणि त्यांची अपेक्षा आजही आहे. त्यादृष्टीने पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी पत्नी नगरसेविका सौ शीला चव्हाण यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली.पक्षाच्या दृष्टीने या दोन्ही घटना सुखद असून एका प्रसंगी श्री.चव्हाण आणि आ.संग्राम जगताप तसेच काँग्रेस चे नगरसेवक यांच्यात सुसंवाद झाला हा दुग्धशर्करा योग.या चर्चेच्या वेळी मी उपस्थित होतो. असेही भुजबळ म्हणाले.
आज पक्षात जी  दुफळी आहे ती श्री किरण काळे आणि त्यांना पाठीशी घालणारे जे कोणी असतील त्यांची ही कृती आहे.त्यामुळे ना.थोरात यांच्या कार्यकर्त्यांमधील दुफळी तशीच ठेवायची की पक्षहीत पहायचे याचा निर्णय संबंधितांनी घ्यावा असे निवेदन श्री भुजबळ यांच्यासह प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, शहर सरचिटणीस अभिजीत कांबळे, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार व रवि सूर्यवंशी ,अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान ,भिंगार महिला काँग्रेस अध्यक्षा मार्गारेट जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले ,ना.बाळासाहेब थोरात आदींना पाठवले आहे.

No comments:

Post a Comment