लाखो रुपयांचा गुटखा, मसाला तंबाखू जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

लाखो रुपयांचा गुटखा, मसाला तंबाखू जप्त.

 लाखो रुपयांचा गुटखा, मसाला तंबाखू जप्त.

उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांचा छापा...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास वर अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतूक टेम्पो (एम एच - 12 टथ 3100) मधून लाखो रुपयांच्या के सरयुक्त विमल पान मसाला, वि - 1 सुगंधी तंबाखू अवैधरित्या विक्री करिता आणणार्‍या आसिफ शेख सिकंदर, आवेद शेख निसार यांना कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने ताब्यात घेऊन एकूण 7,87,200 रुपयांचा गुटखा तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की आज पहाटे 01:45 चे दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांना पुण्यावरून अहमदनगरला लाखो रुपयांचा विमल गुटखा, मसाला युक्त तंबाखू टेम्पो द्वारा नगरला अवैधरित्या विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली. ढुमे यांनी उपविभागीय कार्यालयातील हेमंत खंडागळे कोतवाली पोलिस ठाण्याचे गस्त अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर कचरे, पोका सुजय हिवाळे, तानाजी पवार यांना केडगाव बायपासला सापळा लावण्याचे आदेश दिले.
पोलीस स्टाफ व दोन पंच असे खाजगी वाहनाने निघून केडगाव बायपास अहमदनगर येथे जाऊन सापळा लावून थांबले असता पहाटे 01:45 वा सुमारास अहमदनगर बाजू कडून पुणे बाजूकडे एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो येताना दिसला खात्री होताच टेम्पो चालकास बॅटरी च्या सहाय्याने थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने टेम्पो थांबविला. टेम्पो मधील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांची व पचांची ओळख करून देऊन त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता चालकाचे शेजारी बसलेल्या इसमाने त्याचे नाव आसिफ शेख सिकंदर वय-22 रा. कामठीपुरा झेंडीगेट अहमदनगर, व टेम्पो चालकाने त्याचे नाव जावेद शेख निसार वय 24 पंचपीर चावडी, पठाण वाडा, अमदनगर असे असल्याचे सांगितले.टेम्पोची पंचांसमक्ष पाहणी केली असता टेम्पोमध्ये झडती घेतली असता 3,48,480 रु किमतीचे 8 पोते प्रत्येक पोत्यात पांढर्‍या रंगाच्या प्लास्टिकच्या 10 छोट्या गोण्या प्रत्येक गोणीमध्ये केसर युक्त विमल पान मसाला कंपनीचे नाव असलेले 22 पॅकेट असे एकूण 1760 पॅकेट असलेले प्रत्येकी किंमत 198/रु. की अंदाजे. 38,720 रु किमतीचे 8 पोते प्रत्येक पोत्यात पांढ-या रंगाच्या प्लॅस्टिकच्या 10 छोट्या गोण्या प्रत्येक गोणीमध्ये वि-1 तंबाखू असे नाव असलेले 22 पॅकेट असे एकूण 1760 पॅकेट प्रत्येकी किंमत 22/रु. प्रमाणे की अंदाजे. 4,00,000 रु. किमतीचा एक क्रीम रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो नंबर (एम एच - 12 टथ 3100) असा असलेला जु.वा.किं अंदाजे.7,87,200 रू. मुद्देमाल आढळून आला.  विमल गुटखा सुगंधित तंबाखू सह आसिफ शेख सिकंदर, जावेद शेख निसार यांचे कब्जात मिळून आल्याने ते पोसई कचरे यांनी पंचांसमक्ष जप्त करून तसा सविस्तर पंचनामा करून जप्त मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर बाबत पुढील कारवाई का मी सह. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अहमदनगर यांना कळवून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.  अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो नंबर (एम एच - 12 टथ 3100) मधून इसम असिफ शेख सिकंदर, आवेद शेख निसार हे महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असतानाही त्यांची विक्री करण्याचे उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आला आहे त्याचे विरुद्ध भा.द.वि कलम 188,272,273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment