प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी व सातत्य ठेवून प्रयत्न केले तरच यश निश्चित मिळते--शिवनेरी अकॅडमी चे कॅप्टन लक्ष्मण भोरे.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी व सातत्य ठेवून प्रयत्न केले तरच यश निश्चित मिळते--शिवनेरी अकॅडमी चे कॅप्टन लक्ष्मण भोरे....

 प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी व सातत्य ठेवून प्रयत्न केले तरच यश निश्चित मिळते--शिवनेरी अकॅडमी चे कॅप्टन लक्ष्मण भोरे.... 



नगरी दवंडी

जामखेड - आज दिनांक 22 जून या दिवशी शिवनेरी अकॅडमी मध्ये सत्कार समारंभ सोहळा यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली व अशक्य ते शक्य कसे करून दाखवावे हे या सत्कार मूर्तींनी करून दाखवले ते म्हणजे श्री. नितीन डोंगरे (पोलीस उपनिरीक्षक निवड)श्री. ज्ञानेश्वर गोरे (पोलीस उपनिरीक्षक निवड) तसेच कश्मीर ते कन्याकुमारी चार हजार किलो मीटर सायकलिंग करून पर्यावरण इंधन बचत करुन डॉ. पांडुरंग सानप व त्याचे मित्र श्री.भास्कर भोरे यांनी दाखवून दिले. 

    त्याचप्रमाणे आपल्या जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षक  म्हणून बढती झाली त्याचे सुध्दा अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आले. 

   श्री. नितीन डोंगरे व श्री. ज्ञानेश्वर गोरे यांनी प्रबल ईच्छा शक्ती जर असेल व एकाग्रतेने नियोजन करून अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते तसेच दोन्ही सायकल स्वरांनी कोणतेही गोष्ट अशक्य नाही आपण ती करू शकतो हे दर्शवून दिले त्याच प्रमाणे पोलीस उप निरीक्षक चव्हाण यांनी प्रामाणिकपणे आपण कष्ट करू राहिलो तर निश्चितच त्याचा आपल्या जीवनात फायदा होतो या कार्यक्रमासाठी मुख्य प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, प्रा. मधुकर आबा राळेभात, प्रा. उगले सर (न्यू इंग्लिश स्कूल खर्डा), प्रा. वराट सर,  काळे तलाठी भाऊसाहेब, गणेश झगडे, मा. अजयशेठ कोठारी,  जरे सर, मा.बसवदे सर, मा. पवार सर, विजय नागरगोजे,

पोलीस कर्मचारी ,पत्रकार ओंकार दळवी, पत्रकार पप्पू सय्यद असे बहुसंख्य विद्यार्थी व विध्याथीँनी हजर होते. 

श्री पोलीस उपनिरीक्षक थोरात म्हणले ग्रामीण मुलेच हे करू शकतात इतर शहरी मुले इतपर्यंत पोहचत नाहीत मा. मधुकर आबा म्हणले मागील सात वर्षांपासून शिवनेरी अकॅडमी एक जामखेड करांसाठी प्रेरणास्थान बनले आहे 120 मुले आतापर्यंत भरती झाले आहेत सर्व विद्यार्थ्यांना जिद्द चिकाटी मेहनत करा निश्चित यश मिळते या शुभेच्छा दिल्या

  सूत्रसंचालन एन.सी.सी प्रमुख श्री. मयूर भोसले सर यांचे तर आभार कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले व जास्तीत जास्त तरुणांनी आर्मी व पोलीस मध्ये जॉईन व्हावे येणाऱ्या काळात खूप मोठी भरती होणार आहे हे आव्हान केले

No comments:

Post a Comment