योगा हॉल मुळे महिलांच्या अ‍ॅक्टीव्हीटीला चालना मिळेल - महापौर बाबासाहेब वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

योगा हॉल मुळे महिलांच्या अ‍ॅक्टीव्हीटीला चालना मिळेल - महापौर बाबासाहेब वाकळे

 योगा हॉल मुळे महिलांच्या अ‍ॅक्टीव्हीटीला चालना मिळेल - महापौर बाबासाहेब वाकळे

चैतन्यनगर मध्ये 1 कोटीच्या अत्याधुनिक व वातानुकूलित योगा हॉलचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग पाच मधील चारही नगरसेवकांनी शासनाचा 10 कोटीचा विशेष विकास निधी मिळवल्याने झालेल्या भरपूर विकास कामांमुळे या भागाचा कायापालट झाला आहे. महापौर म्हणून शहरात विकासाचा सपाटा लावत आहे. लवकरच केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणारी पुस्तिका प्रकाशीत करत आहे. भाजपच्या सर्व 15 नगरसेवक विकासाचे टीम वर्क करत आहेत. नगरसेवक भैय्या गंधे यांच्या मुळे होणार्‍या महिलांसाठीच्या या योगा हॉल मुळे महिलांच्या अ‍ॅक्टीव्हीटीला चालना मिळणार आहे. योगा हॉलमुळे या परिसराचे वैभव वाढेल, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
सावेडी येथील चैतन्य नगर मधील ओपन स्पेस मध्ये भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व प्रभाग पाचचे नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या पाठपुराव्या मुळे महापालिका निधीतून मंजूर झालेल्या 1 कोटी रुपयांच्या विकास निधीतून होणार्‍या अत्याधुनिक व वातानुकूलित योगा हॉलचे भूमिपूजन प्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्रीकांत जोशी, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, जेष्ठ नेते सुनील रामदासी, माजी नगरसेवक सुवेन्द्र गांधी, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, नगरसेवक मनोज दुल्लम, आशा कराळे, शहर सरचिटणीस विविक नाईक, सतीश शिंदे, विलास ताठे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भैय्या गंधे म्हणाले, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या आधुनिक योगा हॉल साठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. भव्य व आकर्षक असलेला हा हॉल संपूर्ण वातानुकूलित असणार आहे. नगरसेवक पदाच्या असलेल्या जवाबदारीने या भागातील प्रश्न व समस्या सोडवत आहे. रस्त्यांच्या कामा नंतर आता परिसराच्या सुशोभीकरणावर भर देत आहे. या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे.
यावेळी श्रीकांत जोशी यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे कौतुक करत चैतन्य नगर मधील योगा हॉल परिसरातील सर्वाना फार उपयोगी असणार असल्याचे सांगितले. वसंत लोढा यांनी योगाचे महत्व सांगून या हॉलमुळे योगा संस्कृतीला जपली जाईल असे सांगितले.कार्याक्रमास परिसरातील नागरिक मल्हार गंधे, डॉ.नागदेव, श्री. बागडे, श्री.दीडवाणिया, श्री.कुक्क्डवाल, श्री.कासवा, श्री.खिस्ती, श्री.घोडके, ऋग्वेद गंधे, श्री.पछाडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment