पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करा ः देशमुख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करा ः देशमुख

 पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करा ः देशमुख


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः जागतिक पर्यावरण दिनी श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर प्रांगणात देवस्थानच्या वतीने हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.आज केलेली वृक्ष लागवड ही पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी हितावह ठरणार असल्याने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन प्रत्येकाने करावे असे आवाहन मंदिराचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे सेवेकरी संतसेवक शिवाजी आप्पा होन,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जनसंपर्क अधिकारी पत्रकार सुधीर चव्हाण, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे नेवासा प्रतिनिधी आशिष उर्फ भैय्या कावरे यावेळी उपस्थित होते.यावेळी मंदिर प्रांगणात वड, निंबोनी, पिंपळ हया ऑक्सिजन निर्माण करणार्‍या वृक्षांसह चिंच, सीताफळ, आंबा, अजाणवृक्ष या वृक्षाची लागवड वृक्षारोपणाद्वारे करण्यात आली.
यावेळी बोलताना संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख म्हणाले की आज कोरोनाच्या भयाण संकटामुळे ऑक्सिजनचे महत्व आपल्याला समजले आहे म्हणून ऑक्सिजन निर्माण करणारे वृक्ष हे खरे आपले मित्र आहे वृक्षाचे जीवन परोपकारी असे आहे म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षांपूर्वी नगरेची रचावी,महावने लावावी,जलाशये निर्मावी ,महावने लावावी जेथ तेथ’ हा पर्यावरणाचा संदेश आपल्याला दिला असल्याचे त्यांनी भावी पिढीच्या भवितव्यासाठी एक तरी झाड प्रत्येक मनुष्याने लावावे असे आवाहन केले.
यावेळी माऊलींच्या पैसखांबासह लावलेल्या सर्व वृक्षांचे पूजन ही करण्यात आले.कोरोनाच्या संकटातून लवकरच सर्व जगाला मुक्ती मिळो तसेच सर्व जग सुखी होऊ द्या अशी प्रार्थना यावेळी माऊलींच्या चरणी करण्यात आली.यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे नेवासा प्रतिनिधी आशिष उर्फ भैय्या कावरे यांनी प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक मंदिर प्रांगणात वृक्ष लागवड करून जनजागृती करणार असल्याचा मानस यावेळी बोलताना व्यक्त केला. संतसेवक शिवाजी आप्पा होन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment