सेंट्रल बँकेच्या वडझिरे शाखेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठिय्या आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 22, 2021

सेंट्रल बँकेच्या वडझिरे शाखेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठिय्या आंदोलन

 सेंट्रल बँकेच्या वडझिरे शाखेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठिय्या आंदोलन

बँकेच्या गैर कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे जितेश सरडे यांची आक्रमक भूमिका !

बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले तीन महिन्याच्या आत त्रुटी दूर करण्याचे आश्वासन..!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी : 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वडझिरे शाखेच्या  संदर्भातील अनागोंदी कारभार व बँकेत झालेल्या एक कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी तसेच बँक व्यवस्थापन  खातेधारकांना व्यवस्थित सेवा देत नसल्यामुळे दि. २२ रोजी बँकेमध्ये वडझिरे याठिकाणीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष  जितेश सरडे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले असता  यावेळी  बँकेचा गैरकारभार व बँक व्यवस्थापनातील त्रुटी या संदर्भात केलेल्या तक्रारींची बँकेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत तीन महिन्याच्या आत घोटाळ्याची चौकशी करून खाते धारकांच्या खात्यावरून परस्पर काढले गेलेल्या पैशाची भरपाई मिळेल असे सांगितले. तसेच  बँकेच्या सर्व सेवासुविधा खातेधारकांना योग्य पद्धतीने यापुढे दिल्या जातील अशा प्रकारचे आश्वासन बँकेचे वरिष्ठ अधिकारी नागेंद्र कुमार पांडा व आलोक कुमार यांनी दिले आहे.  यावेळी राष्ट्रवादीचे जितेश सरडे बोलताना म्हणाले की तीन महिन्याच्या आत सेंट्रल बँकेतील सर्व व्यवस्था सुरळीत न झाल्यास पुढे होणार्‍या परिणामांना बँक प्रशासनच जबाबदार असेल. 

 यावेळी आंदोलन स्थळी सरपंच विठ्ठल सरडे, सरपंच निलेश केदारी, सरपंच बाळासाहेब नवले, सरपंच  देवेंद्र जगदाळे, सरपंच डॉ. सुभाष मावळे, चेअरमन अशोक मुळे, चेअरमन दत्ता जगदाळे, उद्योजक महेंद्र गायकवाड, महेश निघूट, तुळशीराम करकंडे, पोपट शेटे, सुभाष सरडे, ईश्वर तिकोने, विकास तिकोने आदी उपस्थित होते  तसेच बँक खातेधारक व वडझिरे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार निलेश लंकेंना अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन..

सेंट्रल बँकेच्या वडझिरे शाखेतील गैरकारभाराच्या संदर्भात आमदार निलेश लंके यांनीही बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांन बरोबर चर्चा केली असून त्यांनाही अधिकाऱ्यांनी वडझिरे शाखेतील गैर कारभार व व्यवस्थापनातील त्रुटी लवकरात लवकर दूर करू असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here