जिजाऊंच्या विचारानेच कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले - आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

जिजाऊंच्या विचारानेच कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले - आ. जगताप

 जिजाऊंच्या विचारानेच कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले - आ. जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजमाता जिजाऊंना स्मृतीदिनी अभिवादन


अहमदनगर-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, सोमा शिंदे, प्रा.अरुण देवढे, अर्जुन ठाणगे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मुलांमध्ये शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडविण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. जिजाऊंनी रयतेला मुलांप्रमाणे जपण्याचे संस्कार शिवरायांमध्ये घडविले. कोरोना संकटकाळात अनेक गरजू घटकातील सर्वसामान्यांना जिजाऊंच्या विचारानेच आधार देण्याचे कार्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, राजमाता जिजाऊंनी शिवबा घडविला व अन्यायाविरोधात लढण्याचे त्यांच्यात बळ निर्माण केले. भावी पिढीला योग्य दिशा देण्यासाठी जिजाऊंच्या संस्काराची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here