जे. एस. एस. गुरूकुल शैक्षणिक आव्हाने पेलवण्यासाठी सक्षम - प्राचार्य श्री.इंद्रभानजी डांगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

जे. एस. एस. गुरूकुल शैक्षणिक आव्हाने पेलवण्यासाठी सक्षम - प्राचार्य श्री.इंद्रभानजी डांगे

 जे. एस. एस. गुरूकुल शैक्षणिक आव्हाने पेलवण्यासाठी सक्षम - प्राचार्य श्री.इंद्रभानजी डांगे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
‘कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत आहे खरी परंतु बालकांच्या शिक्षणाचे यक्षप्रश्न गेल्या दीड वर्षांपासून सर्वच पालकांना सतावत आहे.कालपरत्वे शिक्षणाची दिशा बदलून सर्वसमावेशक शिक्षण जे. एस. एस.गुरुकुल विकसित करत असून या स्कूलने सुरू केलेला एज्युकेशनल अ‍ॅप हा बालकांना अभ्यासाची नक्कीच गोडी लावणार ठरेल’ असा विश्वास प्राचार्य डांगे पॅटर्न चे प्रणेते व राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष श्री. इंद्रभानजी डांगे नुकताच व्यक्त केला आहे.
केडगाव - अहमदनगर येथील जे. एस. एस. गुरूकुलच्या नर्सरी, केजी तसेच पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांच्या नूतन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ तसेच या गुरुकुल ने विकसित केलेल्या क्षीीर्र्सीीीर्ज्ञीश्र अ‍ॅपचे उद्घाटन नुकतेच प्राचार्य डांगे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन करण्यात आले. जे. एस. एस. गुरुकुल चे अध्यक्ष श्री. आनंद कटारिया, प्राचार्या सौ.निकिता कटारिया, सौ.पूनम डांगे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य डांगे यांनी सांगितले की,’ कोरोनामुळे सर्वात जास्त नुकसान बालकांच्या शिक्षणाची झाली आहे.आजही शिक्षणाविषयी विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये औदासीन्य दिसत आहे.ही उदासीनता झटकून शिक्षणाचा हा प्रवाह निरंतर खळाळत राहण्यासाठी नवनवीन उपक्रम शाळांनी सुरू करणे आवश्यक आहे.विद्यार्थी केंद्री कृतियुक्त उपक्रम सतत राबवत असल्याने जे. एस. एस. गुरूकुल शैक्षणिक आव्हाने पेलवण्यासाठी सक्षम आहे.ऑनलाईन शिक्षण हा खेळ नव्हे तर आनंदातून शिक्षण देणारा स्त्रोत ठरला पाहिजे.त्यासाठीच या गुरुकुलने विकसित केलेले  नवीन अ‍ॅप सर्वव्यापक आहे.
यावेळी जे. एस. एस. गुरुकुल चे अध्यक्ष श्री. आनंद कटारिया  यांनी स्कूलने विकसित केलेल्या अ‍ॅप विषयी माहिती देताना सांगितले की,’ या स्कूल अ‍ॅप मध्ये विद्यार्थ्यांच्या हजेरीची दैनंदिन नोंद होणार आहे तसेच ऑनलाईन लेक्चर मध्ये अ‍ॅनिमेशन तंत्राद्वारे निर्मित व्हिडिओ दाखविले जाणार असल्याने अध्यापन प्रभावी होणार आहे. स्कूल फी, अभ्यासपूरक सहशालेय उपक्रम तसेच स्कूलद्वारे निर्मित विविध अ‍ॅक्टीव्हीटीज आदींचा प्लॅटफॉर्म हे अ‍ॅप ठरणार आहे. जे. एस. एस. गुरूकुल संस्थेच्या सावेडी व केडगाव येथील स्कूलमध्ये हे अ‍ॅप विद्यार्थी विकासासाठी वापरले जाणार आहे.’ प्राचार्या सौ.निकिता कटारिया यांनी वर्षभर स्कूल मार्फत  राबविल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती दिली तसेच ऑनलाईन सोहळ्यासाठी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment