युवाचार्य महेंद्रऋषीजी, उपप्रवर्तक अक्षयऋषीजी यांचा बुधवारी नगरमधून विहार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

युवाचार्य महेंद्रऋषीजी, उपप्रवर्तक अक्षयऋषीजी यांचा बुधवारी नगरमधून विहार

 युवाचार्य महेंद्रऋषीजी, उपप्रवर्तक अक्षयऋषीजी यांचा बुधवारी नगरमधून विहार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः परमपूज्य युवाचार्य प्रग्यामहर्षी महेंद्रऋषीजी महाराज, हितमितभाषी पूज्य हितेंद्रऋषीजी महाराज आदिठाणा 2 यांचा 2021 चा चातुर्मास पुण्यातील चिंचवड याठिकाणी होणार आहे. यासाठी दोघेही दि.16 जून रोजी नगरमधील आनंदधाम येथून पुण्याकडे विहार करणार आहेत. तसेच उपप्रवर्तक पूज्य सरलस्वभावी अक्षयऋषीजी महाराज आदि ठाणा 3 यांचा 2021 चा चातुर्मास मनमाड येथे होणार आहे. यासाठी तेही 16 जून रोजी आनंदधाम येथून विहार करणार आहेत. आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांचे परमशिष्य असलेले युवाचार्य महेंऋषीजी महाराज, उपप्रवर्तक अक्षयऋषीजी महाराज हे मागील तीन महिन्यांपासून आनंदधाम येथे आहेत. या काळात त्यांच्या सान्निध्याचा व मार्गदर्शनाचा अनमोल लाभ नगरकर भाविकांना मिळाला. करोना काळात प्रत्येकाला सकारात्मक उर्जा देत मनमनात आशेचा दीप कायम ठेवण्याची शिकवण त्यांच्यामुळे मिळाली. चातुर्मासानिमित्त ते आता विहार करणार आहेत, अशी माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here