अखेर ठरलं! ‘महापौर’ कोणाचा? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

अखेर ठरलं! ‘महापौर’ कोणाचा?

 अखेर ठरलं! ‘महापौर’ कोणाचा?

। शिवसेना नगरसेवक उद्या सहलीवर.. । नव्या समीकरणांवर मुंबईत निर्णय..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे चर्चा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आगामी महापौर पद मिळविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून उद्या शिवसेनेचे नगरसेवक मुंबईच्या सहलीवर निघणार आहेत. शिवसेना राष्ट्रवादी शी युती करून महापौर पद प्राप्त करण्याचा विचार करीत असली तरी, वेळ आली तर भाजपाच्या पाठिंब्याचाही विचार करू शकते. अर्थात याबाबत निर्णय राज्य पातळीवर होण्याची शक्यता आहे कुठल्याही स्थितीत महापौरपद मिळविण्याचे शिवसेनेने ठरवले असल्याचे संकेत मिळत आहेत.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाल्यापासून मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. एकीकडे राष्ट्रवादी नेते शरद पवार आगामी विधानसभा लोकसभा निवडणूक शिवसेनेबरोबर लढविण्याचा निर्धार व्यक्त करीत असताना शिवसेना सावध पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील भाजपा शिवसेना नेते एकमेकांच्या विरोधात बोलत असली तरी सर्व प्रकार ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असा प्रकार सुरू आहे यामुळे नगर शहरातूनही भाजपा शिवसेना एकत्र येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
नगर शहरात शिवसेना राष्ट्रवादीचं जमत नसलं तरी शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते आ. संग्राम जगतापांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.
पुढील दहा दिवस महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे आजपासून 9 दिवसांनी महापौर पदावरून दूर होणार आहेत. यामुळे एक दोन दिवसात महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीचे महत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप. आमदारांची सध्या भाजपबरोबर युती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची मदत मिळेल याचा विचार करूनच ते निर्णय घेण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा राष्ट्रवादी शिवसेना एकत्र निवडणुका लढविण्याचे शरद पवार यांनी जाहीर केले असल्यामुळे आता शिवसेनेला राष्ट्रवादीने महापौरपदासाठी मदत केली तर पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी जगताप यांना ते फायद्याचे ठरणार आहे याचा ते निश्चित विचार करतील यात शंका नाही शिवसेनेचे 23 व राष्ट्रवादीचे 19 एकत्र आले तर शिवसेनेचा महापौर होऊ शकेल भाजपाने उमेदवार नसल्यामुळे निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसकडे महापौरपद मिळविण्या इतके बलाबल नाही त्यामुळे शिवसेनेकडे महापौर पद जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तेच्या गणितावर नगर महापालिकेच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार यात शंका नाही.

शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी काल हॉटेल यश ग्रँड मध्ये शिव सेना नगरसेवकांची बैठक घेवून महापौर पदाबाबतची रणनीती ठरवली असून या बैठकीला नगरसेवक बाळासाहेब बोराटे,  शाम नळकांडे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, योगीराज गाडे, सुभाष लोंढे, सचिन शिंदे, आदींसह माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, दत्ता जाधव, परेश लोखंड़े उपस्थित होते. शिवसेनेकडून महापौरपदाची निवडणूक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हाती घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा की नाही काँग्रेसच्या उमेदवाराबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांंमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. उद्याच्या मुंबई सहलीस काही नगरसेवकांचा विरोध आहे. बहुतांश नगरसेवकांचे स्वतःचे व्यवसाय असून कोरोना काळातील निर्बंधांमुळे ते बंद होते व आता अनलॉक झाल्याने व्यवसाय बर्यापैकी सुरळीत होत असताना काही दिवसांसाठी बाहेरगावी जाण्यास अनेकांची नापसंती आहे. मात्र, पक्षादेश असेल तर जाण्याची तयारीही नगरसेवक करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here