केडगाव औद्योगिक वसाहतीतील समस्या तडजोडीने मार्गी लावू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

केडगाव औद्योगिक वसाहतीतील समस्या तडजोडीने मार्गी लावू.

 केडगाव औद्योगिक वसाहतीतील समस्या तडजोडीने मार्गी लावू.

लघुउद्योजकांना आ. संग्राम जगतापांनी दिले आश्वासन..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केडगाव औद्योगिक वसाहती तील मुख्य रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे.यासाठी राज्यासरकार कडून काँक्रिटीकरण रस्त्यासाठी  निधी उपलब्ध करून देणार आहे.याचा बरोबर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहे, ड्रेनेज लाईन असा प्रश्नही तातडीने सोडविण्यात येईल. केडगावच्या औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या असून त्या तडजोडीने मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी या परिसरातील लघुउद्योजकांना दिले आहे
केडगावात औद्योगिक वसाहतीतील डेनेजलाईनतह  अंतर्गत रस्त्याचे प्रचंड दूरव्यवस्था झालेली आहे.या परिसरातील पथदिवे देखील बंद पडलेले आहे याबाबत येथील लघु उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे विविध समस्या मांडल्या होत्या त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव औद्योगिक वसाहत जाऊन पाहणी केली. केडगाव इंडस्ट्रियल एरियामध्ये लघु उद्योग मोठ्या प्रमाणात त्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावुन, लघु उद्योगाच्या माध्यमातून शहरातील युवकांरांची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवणे गरजेचे आहे अशा भावना पाहणी करताना आ. जगताप यांनी व्यक्त केल्या  यावेळी अहमदनगर इंडस्ट्रियल ईस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सतीश बोरा, व्हा. चेअरमन नितीन पठवा, संचालक अरविंद गुंदेचा, संतोष बोरा, मेहुल भंडारी, उद्योजक किरण पोखरणा, योगेश मंत्री, रुपेश मंत्री, नरेश गांधी, माणिकराव विधाते, शाखा अभियंता निंबाळकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment