वृक्ष प्रत्येकाच्या जीवनाचा श्वास झाल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज ः वारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

वृक्ष प्रत्येकाच्या जीवनाचा श्वास झाल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज ः वारे

 वृक्ष प्रत्येकाच्या जीवनाचा श्वास झाल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज ः वारे

नगर ट्रेकर्सचे अर्बन बँक कॉलनीत वृक्षदान व लागवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरानाच्या संकटात ऑक्सिजनचे महत्व आता समजले आजही त्याची कमतरता भासत आहे. वृक्ष हा प्रत्येकाच्या जीवनाचा श्वास झाल्याने आता खर्या अर्थाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
प्रभाग 2 मधील शिलाविहार जवळील अर्बन बँक कॉलनीत नगर ट्रेकर्सच्या वतीने वृक्षदान व लागवड पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांना श्री.वारे यांनी पर्यावरण, वृक्षारोपण त्याचे संवर्धन याचे महत्व सांगितले.
यावेळी परिसरात सुमारे 35 वृक्षे लावण्यात आली. त्याचा शुभारंभ नगर टेकर्सचे सुरज कपाळे, मारुती गुंजकर, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत बल्लाळ, सुधाकर देशपांडे, मच्छिंद्र तुवर, सतीश शहा, प्रसाद रिंगणे, बिभिषण अनभुले, सतीश बल्लाळ,  रविंद्र पहिलवान, रवि वारे आदि उपस्थित होते.यावेळी सुधाकर देशपांडे म्हणाले, झाडे लावा झाडे जगवा असे फक्त आपण म्हणतो, प्रत्यक्षात आता कृती करणे गरजेचे आहे. प्राणवायुचे महत्व कोरोनामुळे आता सर्वांनाच समजले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झाडे कमी होत आहे, त्यामुळे पक्षांसाठीचा अधिवास कमी होत आहे. त्यामुळे वृक्षारोपण व त्यांचे संगोपन प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरज कपाळे यावेळी म्हणाले, नगर ट्रेकर्सच्यावतीने वृक्षदान व लागवड उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक कॉलनीत झाडे लावून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करणार यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी झाडे जगविण्यासाठी आम्ही स्वत: काळजी घेऊ, असे नागरिकांनी सांगितले. शेवटी रवि वारे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment