कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व समजले ः सय्यद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व समजले ः सय्यद

 कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व समजले ः सय्यद

मखदुम सोसायटीच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा र्हास झाल्याने निसर्ग संतुलन बिघडले. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्ग संपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे ऋतुचक्रही बिघडले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना काळातही ऑक्सिजनचे महत्व लक्षात आल्याने निसर्ग हा आपल्या जीवनात किती महत्वाचा घटक आहे हे आता सर्वांनाच समजले असल्याने वृक्षारोपण व संवर्धन होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रभावी ठरणारी लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाचे सर्व नियम पाळून लस घेऊन कोरानावर मात करावी, असे आवाहन इंजिनिअर, आर्किटेक्ट अ‍ॅण्ड सर्व्हेअर असोसिएशनचे संचालक इंजि.इकबाल सय्यद यांनी केले.
मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त लस घेतलेल्या लोकांना रोपे देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी इंजि.इकबाल सय्यद, रुग्णमित्र नादीर खान, प्रसिद्ध कवियत्री डॉ.कमर सुरुर, मुस्कान वेलफेअरचे अध्यक्ष शफकत सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मजहर सय्यद आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना इंजि.इकबाल सय्यद म्हणाले, कोरोना महामारीने अनेकांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली. परंतु एक झाड हे आठ जणांना पुरेल एवढा ऑक्सिजन दररोज देते, त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावल्यास शुद्ध ऑक्सिजन मिळेल, त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासणार नाही. यासाठी वृक्षारोपण व संवर्धन किती महत्वाचे आहे, हे त्यांनी सांगितले.
शफकत सय्यद म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लस घेतलेल्या नागरिकांना संस्थेच्यावतीने आठ दिवस या रोपांचे हॉस्पिटल, कोविड सेंटर व वैयक्तिकरित्या रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here