घोडेगाव-मिरी रोडला जोडणारा रूपेवाडी-चांदा रोड खुला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

घोडेगाव-मिरी रोडला जोडणारा रूपेवाडी-चांदा रोड खुला

 घोडेगाव-मिरी रोडला जोडणारा रूपेवाडी-चांदा रोड खुला

पाथर्डी  - रूपेवाडी गावातून दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा गावातील रस्ता प्रशासनाला  कोणतीही सूचना न देता काही अविचारी व्यक्तींनी दोन महिन्यापासून बंद केला होता या रस्त्याने चांदा लोहरवाडी व उत्तरेकडील शेतकर्‍याची  दुग्ध व्यवसायकांची फार मोठी नुकसान होत होती व उत्तरेकडील राहणारे नागरिक आजारी पडल्यानंतर दवाखान्यात  जाण्यासाठी  या रस्त्याने जाता येत नसल्या कारणाने चार किलोमीटर अंतरावरून दुसर्‍या रस्त्याने हॉस्पिटलला जावा लागत होते व रुग्णाला औषध उपचार वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते, या मुळे वरिष्ठ पातळीवरील शासनाचा दबाव आणून आज दिनांक 30/05/2021 रोजी दुपारी 3वा. रस्ता खुला करण्यात आला याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेळकेसाहेब,  सरपंच अशोकराव दहातोंडे, ग्रामसेवक हरिश्चंद्रे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य  उद्धव गोडसे,  माजी सरपंच  सर्जेराव सोलाट, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच एडवोकेट बाळासाहेब  पुंड, सोसायटी संचालक  गोडसे, अशोक शेळके, बाबासाहेब शेळके, विठ्ठल चांगुलपाई, संजय मोहिते, शिवाजी गोडसे, पोपट शेकडे , आदिनाथ  शेळके, दिलीप शेळके, राम आठरे, अभय शेकडे, शिवाजी शेळके, नवनाथ आठरे, संपत मिठे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या रस्त्याची पाहणी करून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेळके साहेब यांनी गाव नकाशा व प्रत्यक्ष असलेला रस्ता याची शहानिशा करून पंचनामा करून घेतला आहे या प्रसंगी निर्णय देताना शेळके साहेब यांनी सांगितले की गावठाण  ची मोजणी करून सीमा निश्चित कराव्यात आणि तोपर्यंत रस्ता हा खुला करण्यात यावा जोपर्यंत सीमा निश्चित होत नाही व गटाची मोजणी होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत रस्ता हा बंद करता येणार नाही अशी तंबी रस्ता बंद करणार्‍या कुटुंबीयांना दिली आहे.  घोडेगाव- मिरी रोड वरून चांदा,लोहरवाडी व उत्तरेकडील शेतकर्‍यांना हा रस्ता दळणवळण करण्यासाठी खुला झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील राहणार्‍या नागरिकांना फार मोठा दिलासा  मिळाला आहे. हा रस्ता खुला करुन दिल्याबद्दल पोपट शेळके यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांचे व कर्मचार्‍याचे आभार मानले व धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment