आ.लंके यांचे प्रयत्नातुन पारनेर-नगर मतदार संघात ५ कोटींचा निधी मंजुर ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 17, 2021

आ.लंके यांचे प्रयत्नातुन पारनेर-नगर मतदार संघात ५ कोटींचा निधी मंजुर !


 आ.लंके यांचे प्रयत्नातुन पारनेर-नगर मतदार संघात ५ कोटींचा निधी मंजुर !


नगरी दवंडी

पारनेर : प्रतिनिधी :

 कोरोना महामारीचा वेग मंदावू लागताच आमदार नीलेश लंके यांनी मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून ५ कोटी १५ लाख रूपये खर्चाच्या  कामांना मंजुरी मिळाल्याची माहीती आ. लंके यांनी दिली. 

 नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत यु पी एस सी, एम पी एस सी अभ्यासिकेसाठी एक कोटीचा निधी मंजुर करण्यात आला असून निघोज येथील पोलिस दुरक्षेत्राजवळ ही इमारत उभी करण्यात येणार आहे. तालुक्यातील अनेक विदयार्थी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करीत असून आर्थिक अडचणींमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या परिक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळत नाहीत.  अभ्यासासाठी संदर्भग्रंथ उपलब्ध होत नाहीत. मतदारसंघातील विदयार्थ्यांची ही अडचण लक्षात घेउन आ. लंके यांनी परीपूर्ण अभ्यासिकेसाठी पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून लवकरच या कामास सुरूवात हाईल. 

२५/१५  लेखाशिर्ष अंतर्गत वाळवणे गावठाण ते शिवरस्ता नळकांडी पुलासह रस्त्याचे काम करणे २० लक्ष, पिंपळनेर प्रयत्न शिक्षण संस्था शाळा खोली बांधकाम १० लक्ष, विरोली गणपती चौफुला सामाजिक सभागृह बांधणे ५० लक्ष, आपधूप पांडूरंग मंदीर सभामंडप १५ लक्ष, वाडेगव्हाण गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण १५ लक्ष, मौजे निंबळक ता. नगर माळवाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लक्ष, मौजे खंडाळा नगर दौंड आरणगांव शिवरस्ता करणे २० लक्ष, मौजे खडकी ता. नगर जुणे तुळजभवानी मंदीर सभामंडप बांधणे १० लक्ष, मौजे बाबुर्डी ता. नगर बाबुर्डी बेंद गावठाण ते चिमणवस्ती खंडोबा मंदीर रस्ता १५ लक्ष, मौजे टाकळीढोकेश्‍वर गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण २० लक्ष, मौजे पारनेर सोबलेवाडी जि. प. शाळा संरक्षक भिंत बांधणे १५ लक्ष, मौजे वडगांदर्या गावठाण ते गव्हाळी रस्ता करणे १० लक्ष, मौजे काताळवेढे दत्त मंदीर रस्ता २० लक्ष, मौजे जवळा भावनीमाता रस्ता २० लक्ष, मौजे काकणेवाडी श्रीराम मंदीरासमोर सभामंडप करणे १० लक्ष, मौजे वाघुंडे दिवटे मळा ते वाघुंडे हंगा नदीवर पुलाचे बांधकाम करणे ४० लक्ष. 

जनसुविधा अंतर्गत मौजे कामरगांव ता. नगर येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लक्ष, मौजे देहेर ता. नगर ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लक्ष, मौजे गुणौरे स्मशानभुमी बांधकाम करणे १० लक्ष. 

३०/५४ लेखाशिर्षांतर्गत गोरेगाव ते ब्राम्हणदरा रस्ता ग्रा मा. २८० पुलाचे काम २० लक्ष, वडझिरे बाभुळवाडे अक्कलवाडी ठाकरवाडी रस्ता घाट अपघात प्रवण भागाची सुधारणा व दुरूस्ती ३० लक्ष, निंबळक ते माळवाडी रस्ता १५ लक्ष.

        कोरोना काळातही इतका भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण मतदारसंघातून आमदार निलेश लंके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .


No comments:

Post a Comment