शिर्डीतील व्यवसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने वेळ जारी..!! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 12, 2021

शिर्डीतील व्यवसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने वेळ जारी..!!

 शिर्डीतील व्यवसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने वेळ जारी..!!

शिर्डी नगरपंचायत मध्ये शहरातील व्यापाऱ्यांची बैठक संपन्न..!नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी : 

कोरोनाने देशासह महाराष्ट्रात हाहाकार माजवला होता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाला दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीरीत्या राबविल्याने कोरोनाच्या रुग्णांचीसंख्या कमी होत गेली व पर्यायाने महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यात नियम देखील करण्याचे निर्णय घेतले. त्यात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर जे योग्य निर्णय असतील ते घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अधिकार शासनाने दिले आहेत. त्याच अनुषंगाने आज शिर्डी नगरपंचायतच्या व्यापाऱ्यांची दुकानांच्या वेळेसंदर्भात बैठक नगर पंचायत मध्ये बोलवण्यात आली होती. यावेळी व्यापाऱ्यांची मते जाणून घेत त्यांच्या समस्या आणि ग्राहकांची मागणी या सर्व बाबी विचारात घेत सर्वानुमते सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत दुकाने खुली रहाणार व सायंकाळी ६ नंतर दुकाने बंद राहतील ( मेडिकल व दवाखाने वगळता) तसेच मंगळवारी जनता कर्फ्यू पाळण्या येईल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि व्यापाऱ्यांमध्ये रवींद्र गोंदकर, सतीश गंगवाल, किशोर गंगवाल, कमलेश लोढा, निलेश गंगवाल, आनंद लोढा, किराणा व्यावसायिक, भाजीपाला व्यवसायिक, फळविक्रेते यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here