विकास कामांबरोबरच योग भवन उभारणार- संपत बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

विकास कामांबरोबरच योग भवन उभारणार- संपत बारस्कर

 विकास कामांबरोबरच योग भवन उभारणार- संपत बारस्कर

प्र. क्र.1 मधील डॉन बॉस्को परिसरामध्ये योग भवन उभारणीच्या कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः योगा मुळे मानवी आरोग्या निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते त्यामुळे मानवाची रोग प्रतिकार शक्ती वाढली जाते नगर शहरामध्ये ठीक-ठिकाणी योग भवन उभारून आरोग्य मंदिर निर्माण करावे,गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटाला आपण सर्वजण तोंड देत आहोत, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकाने योगासने करणे गरजेचे आहे.कोविड संकट काळामध्ये योगाचे महत्व संपूर्ण जगाला समजले, या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे महत्त्व पटले आहे यासाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये डॉन बॉस्को परिसरामध्ये आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून योग भवन उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी व्यक्त केले.
आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मध्ये डॉन बॉस्को परिसरात योग मंदिराचे भूमिपूजन योग शिक्षक मधुकर निकम व आसाराम वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मनपा आरोग्य समितीचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, सुरेश शेळके,अविनाश कुलकर्णी, दादा गायकवाड, श्याम जाधव, दादा घोरपडे, गणेश मोकासे, विनोद जोंधळे,कमलेश कटारिया,बजरंग वाघ, गणेश बारस्कार, सोनलो खलारे, संगीत राहुलकर, मधुमती चौधरी, डिसोजा मेरी आदी उपस्थित होते.
योग शिक्षक मधुकर निकम म्हणाले की, मावीन जीवनामध्ये योगला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे, योगा केल्याने मानवाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. त्यामुळे कोरोना संकट काळामध्ये योगा करणार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही, यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगा करून आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवावे तसेच योगाच्या माध्यमातून आनंदित जीवन जगावे, योग प्रक्रिया ही भारतीय संस्कृतीमध्ये खूप जुन्या काळापासून चालत आली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, नगरसेविका दीपालीताई बारस्कर यांच्या माध्यमातून योग्य मंदिर उभे राहत आहे हे कार्य कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment