गुरूकुल मंडळ व प्राथ.शिक्षक समिती कडून आरोळे कोविड सेंटरला आॕक्सिजन काॕन्सनट्रेटर भेट.
नगरी दवंडी
तालुका प्रतिनिधी
कोरोना महामारीमध्ये रूग्णांची सेवा करत राज्यभरात जामखेड येथील आरोळे पॕटर्न प्रभावी ठरला.प्राथ.शिक्षकांनी तालुक्यासह जिल्ह्यातून लाखो रू.निधी विविध कोविड सेंटरला दिला.परंतु यावरच न थांबता गोरगरीब रूग्णांना आॕक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील प्राथ. शिक्षकांचे गुरूकुल मंडळ व शिक्षक समिती,संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील आरोळे कोविड सेंटरला सुमारे ६०,०००/- रू किंमतीचे आॕक्सिजन काॕन्सनट्रेटर भेट देऊ केले. समाजाप्रती शिक्षकांनी रूण व्यक्त केले.यावेळी पंचायत समिती सभापती सुर्यकांत नाना मोरे,ढेपे सर, सुलताना मॅडम पत्रकार पप्पुभाई सय्यद यांचे वाढदिवस साजरा करण्यात आले.
याप्रसंगी तालुक्याचे सभापती सूर्यकांत मोरे,आरोळे सेंटरचे संचालक रवीदादा आरोळे,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड बिडीओ परसराम कोकणी,सुलताना शेख,लक्ष्मण ढेपे,विकीभाऊ सदाफुले,मंगेश आजबे,शरद कार्लेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा.शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी आपल्या शिक्षक सहकार्यांसमवेत आॕक्सिजन मशिन रवीदादा आरोळेंना सुपूर्द केले..
यावेळी गुरूकुल आणि शिक्षक समितीचे शिक्षक समाजसेवक श्री.संजय घोडके,संतोष डमाळे,अनिल अष्टेकर,महिला अध्यक्षा शिल्पा साखरे,गुरूकुल अध्यक्ष राम ढवळे,दत्तात्रय ऊदारे,उत्तम पवार,जितेंद्र आढाव,अशोक घोडेस्वार,प्रताप पवार,पोपट तुपसौंदर,अजित गोरड,सचिन अंदुरे,नाना बांगर,सुशिल पौळ यांसह अनेक शिक्षक उपस्थित होते..
No comments:
Post a Comment