महापौर शिवसेनेचाच! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 23, 2021

महापौर शिवसेनेचाच!

 महापौर शिवसेनेचाच!

मुंबईत वाजला महापौर निवडणुकीचा बिगुल..
शहरात शिवसेना-राष्ट्रवादी युती, काँग्रेस नाराज.




नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सुमारे 1 वर्षापासून आगामी महापौर आमचाच, असा हट्ट धरून बसलेल्या शहरातील शिवसेनेला राज्यस्तरीय राष्ट्रवादी-शिवसेना नेतृत्वाने राष्ट्रवादीचा महापौर असेल अशी ग्वाही देणार्‍या आ. संग्राम जगतापांच्या साक्षीनेच शिवसेनेच्या महापौरपदावर शिक्कामोर्तब केले. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी यापुढे नगर शहरात कार्यरत राहण्याचे बिगुल काल मुंबईत वाजत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचा कोणी नेता उपस्थित नसल्यामुळे शहरात महाविकास आघाडीची नव्हे तर राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाली असेच म्हणावे लागेल. या निर्णयावर काँग्रेस पक्ष नाराज झाला असून, शिवसेनेतील नाराज गट, भाजपाचे नगरसेवक, बसपा, अपक्षांची मोट बांधून शिवसेना व राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखविण्याचा विचार करीत असून, असे झाल्यास घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता आहे. ऑफर तगडी असेल तर काहीही घडू शकते. पडद्याआडून बर्‍याच हालचाली सुरू असून, चर्चा, बैठका शहरात सुरू आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत भाजप नसला तरी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नव्या समीकरणावर बारीक लक्ष ठेवून व्यूहरचना करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. महापौर शिवसेनेचा, उपमहापौर राष्ट्रवादीचा असे सूत्र कालच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ठरले असून, 30 जूनला सकाळी 11 वाजता महापौरपदाची निवडणूक होणार आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप,  नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सध्या नगर महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचे 23, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 19, असे नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे पाच नगरसेवक आहे. तर भाजपचे 15, अपक्ष एक तर बसपा 4 असे एकूण 67 चे संख्याबळ महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहे. एक जागा ही रिक्त असून त्या जागेवर

काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महाविकासआघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निर्धार केला असल्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment