जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून गरजूंना प्लाझ्मा पुरवठ्याचे मोठे कार्य : राजेश झंवर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून गरजूंना प्लाझ्मा पुरवठ्याचे मोठे कार्य : राजेश झंवर

 जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून गरजूंना प्लाझ्मा पुरवठ्याचे मोठे कार्य : राजेश झंवर

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त प्लाझ्मा दात्यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाच्या बायोलॉजीकल वॉरच्या विरोधात भारत खंबीरपणे एकजुटीने उभा राहत एकमेकांना साथ दिली आहे. जनकल्याण रक्तपेढीला रक्तदान व प्लाझ्मादान करण्यासाठी नागरिकांनी हिरीरीने साथ दिली. प्लाझ्माची मागणी मोठ्याप्रमाणात वाढल्यावर प्लाझ्मा संकलनासाठी उद्धोजक नरेंद्र फिरोदिया यांनी रक्तपेढीला नवे मशीन दिल्याने वेगाने प्लाझ्मा संकलन होवू शकले. रक्तपेढीच्या माध्यमातून गरजूंना प्लाझ्मा पुरवठ्याचे मोठे कार्य होवू शकले. ज्यांनी रक्तपेढीत प्लाझ्मादान केले त्यांना या कार्यात जनकल्याण रक्तपेढीचे मित्र म्हणून सामावून घेत आहोत, असे प्रतिपादन जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर यांनी केले.
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने करोनाच्या दुसर्‍या लाटेत ज्या सामाजिक संस्था व नागरिकांनी रक्तपेढीत येवून प्लाझ्मादान केले अशांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर होते. यावेळी रा.स्व.संघाचे शहर संघचालक शांतीलाल चंदे, रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर, कोषाध्यक्ष अनिल धोकरीया, सहकार्यवाह प्रमोद सोनटक्के, संचालक प्रा.भानुदास जगताप, राजेश परदेशी आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी व रक्तदाते उपस्थित होते. यावेळी डॉ.रवींद्र साताळकर म्हणाले, रक्तदात्यांनी केलेल्या सहकार्यामुळे गरजूंना वेळेत प्लाझ्मा देता आल्याने कित्तेकांचे प्राण वाचवता आल्याने सर्व रक्तदात्यांचे आभार. आता करोनाची लाट ओसरत असली तरी डेंगू व कॅन्सरच्या रुग्णांना प्लेटलेटची व थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येत रक्तदानाच्या कार्यात सहभगी होत जनकल्याण रक्तपेढीला सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात जनसंपर्क अधिकारी डॉ.विलास मढीकर म्हणाले, जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून जानेवारी ते मे महिन्यापर्यंत 350 रुग्णांना प्लाझा बॅक्स देण्यात आल्या. यासाठी सुमारे 135 दात्यांनी सहकार्य केले. जिल्ह्यात कानाकोर्‍यात तसेच जिल्ह्या बाहेरही वेळेवर प्लाझ्मा देवू शकलो. यावेळी उपस्थित असलेले आशिष शिंगवी, मनीष लोढा, रवी दंडी, मदन झंवर आदींनी आपले अनुभव सांगितले. यावेळी रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ठे, सोनाली खंदारे, गजेंद्र सोनावणे, डॉ.सुशांत पारनेरकर, सागर उंडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment