शिवसेना राष्ट्रवादीचे अखेर ठरले... महापौर शिवसेनेचाच - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 22, 2021

शिवसेना राष्ट्रवादीचे अखेर ठरले... महापौर शिवसेनेचाच

 शिवसेना राष्ट्रवादीचे अखेर ठरले...शिवसेना राष्ट्रवादीचे अखेर ठरले...
नगरी दवंडी

नगर - नगर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मुंबई येथे पार पडली असून या बैठकीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे येऊन ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख कोरगावकर यांनी दिली आहे.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. शिवसेना व राष्ट्रवादीची बैठक घडवून आणण्यासाठी व शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप,  नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होऊ घातलेली आहे. दिनांक 30 जून रोजी पहिला महापौर पदाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे नव्याने महापौरपदाची निवडणूक होणार आहे. नाशिक विभागीय आयुक्तांकडे नव्या महापौर पदाच्या निवडणुकीकरता प्रस्ताव येथील प्रशासनाने पाठवलेला आहे. त्या प्रस्तावाची तारीख येत्या एक-दोन दिवसांमध्ये येण्याची सुद्धा शक्यता आहे. नगरच्या महापौर पदाकरता आरक्षण निश्चित झालेले असून हे महापौर पद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरिता निश्चित करण्यात आलेले आहे.

नगरच्या महानगरपालिकेमध्ये याअगोदर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी एकत्रितपणे सत्ता होती. राज्यामध्ये महा विकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर राजकीय गणितेही बदलली गेली आहे. सध्या नगर महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचे 23, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 19, असे नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे पाच नगरसेवक आहे. तर भाजपचे 15, अपक्ष एक तर बसपा 4 असे एकूण 67 चे संख्याबळ महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहे. एक जागा ही रिक्त असून त्या जागेवर पोटनिवडणूक झालेली नाही. एकूण 68 पैकी 67 नगरसेवक सध्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत.

नगर महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींना गेल्या पंधरा  दिवसांपासून वेग आलेला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले होते. तर राज्यभर यामध्ये ज्या वेळेला महा विकास आघाडीची स्थापना झाली, त्या वेळेला सर्व निवडणुका या एकत्रित पणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्या दृष्टिकोनातून नगरची महापौरपदाची निवडणूक सुद्धा महाविकासआघाडी म्हणूनच लढण्याचा विषय सुरू झालेला होता. आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महाविकासआघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे येऊन निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले असल्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.

नगरी दवंडीच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की राज्यांप्रमाणेच अहमदनगर महापालिकेतही महा विकास आघाडीच राहणार असून महापौर हा शिवसेनेचाच होणार आहे. व उपमहापौर ,सभागृह नेता, महिला बालकल्याण समिती ही पदे बैठक घेऊन कोणाला द्यायची हे ठरवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here