शेतकर्‍यांचे बँक खाते पुर्ववत सुरु कराव मनसेचे कैलास दरेकर यांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

शेतकर्‍यांचे बँक खाते पुर्ववत सुरु कराव मनसेचे कैलास दरेकर यांची मागणी

 शेतकर्‍यांचे बँक खाते पुर्ववत सुरु कराव मनसेचे कैलास दरेकर यांची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः  आष्टी तालुक्यातील काही शेतकर्‍यांचे खाते भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकारी यांनी पीककर्ज थकीत झाल्याने होल्ड केलेले आहेत परतुं गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण देश अपत्तीग्रस्त असताना पूर्ण लॉकडाऊन असताना शेतकर्‍यांचे खाते असे होल्ड करणं योग्य नाही.बँकेच्या शाखाधिकारी यांनी पीककर्ज थकीत असणारे शेतकर्‍यांचे खाते होल्ड केलेले आहेत. कोरोनाची मोठ्या प्रमाणात महामारी असताना हाताला कामे नाहीत. जीवन जगणं अशक्य झालेले आहे.यातच आता काही दिवसांत खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी यांना बी-बीयाणे खरेदी करणं शक्य नाही.यामुळे ज्या शेतकर्‍यांचे खाते होल्ड करण्यात आले आहेत ते तात्काळ पूर्ववत सुरु  करावेत.जेणेकरून त्यांना मिळणार्‍या पंतप्रधान किसान योजनेचा निधी शेतकर्‍यांना बी-बीयाणे खरेदीसाठी उपयोग होईल.यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसीलदारांना निवेदन देवून शेतकर्‍यांचा खाते पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here