लॉरेन्स स्वामी मोक्का प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

लॉरेन्स स्वामी मोक्का प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता

 लॉरेन्स स्वामी मोक्का प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बहुचर्चीत असलेले लॉरेन्स स्वामी या मोक्का प्रकरणामध्ये अटक असलेल्या इतर सर्व आरोपींची  विशेष मोक्का  न्यायाधिश यांचे न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. या प्रकरणात नोव्हेंबर 2020 पासून अटक असलेले व मागील 6 महिन्यापासून कारागृहात असलेले आरोपी  अर्जुन सबाजी ठुबे, प्रकाश दशरथ भिंगारदिवे, संदिप परशुराम वाकचौरे यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स दोराई स्वामी यांचा यापूर्वीच जामीन मंजूर झालेला असल्याने ते सदर प्रकरणात पूर्वीच जामीनावर खुले आहेत.
अहमदनगर येथे मोक्का न्यायालय स्थापन झाल्यानंतर लॉरेन्स स्वामी व इतर आरोपी यांचा हा नगर मोक्का  न्यायालयातील पहिलाच खटला होता व त्या खटल्यामध्ये अटक सर्व आरोपींना आता जामीन मिळालेला आहे. सदर प्रकरणामध्ये आरोपींचे वतीने अ‍ॅड. सतिश गुगळे व अँड. परिमल फळे यांनी काम पाहिले असून त्यांना अ‍ॅड. महेश देवणे, अँड. हेमंत पोकळे, अ‍ॅड. घनशाम घोरपडे, अ‍ॅड. संदीप शेंदुरकर, अँड. विशाल पठारे यांनी सहाय्य केले. या प्रकरणामध्ये तपास सुरु असताना तपासी अधिकारी यांनी तपास कामी वेळ वाढवून घेणेबाबतच्या मुद्यावर वर आरोपी यांचे वतीने आरोपीस जामीनावर खुले करण्याबाबतचे अर्ज मार्च 2021 मध्ये सादर करण्यात आले होते व सरकार पक्षाद्वारे मुदतवाढीचा अर्ज व त्या प्रकरणी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबी व तरतुदीचे पालन झाले नसल्याने आरोपी यांना वरील गंभीर बाबींचे अवलोकन करता आरोपी हे जामीन मिळण्यास पात्र आहेत या व इतर कायदेशीर मुद्यांवर आरोपी यांचे वतीने अ‍ॅड. सतिश गुगळे व अ‍ॅड. परिमल फळे यांचे वतीने नुकताच विशेष न्यायालयामध्ये युक्तीवाद करण्यात आला. वरील युक्तीवाद हा कायदेशीर व ग्राह्य धरत न्यायालयाने प्रकरणामध्ये मागील सहा महिन्यापासून अटक असलेले वर नमुद आरोपी यांची जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला.

No comments:

Post a Comment